———————————
वाढवणा पाटीवर प्रवाशांना झाडाचा आधार
चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-उन्हाचा पारा चाळीशीच्या पुढे गेल्याने जनतेच्या अंगा मधून घामाच्या धारा वाहत आहेत.आणि अशा कडक कडीत उन्हात वाढवणा बु. परिसरातील वीस गावच्या प्रवाशांना निवा-याअभावी रस्त्यावर जागा दिसेल तिथे बसची वाट बघत थांबावे लागते.त्यात बस वेळेवर येईना आणि वाढवणा बु. पाटीवर प्रवाशी निवारा शेड बांधायचे कुणीही मनावर घेईना.म्हणुन जेष्ठांसह बाल प्रवाशांची उन्हात होरपळ होत असल्याचे आणि बस यायची वाट बघत प्रवाशी झाडाखाली थांबल्याचे चिञ उदगीर तालुक्यातील वाढवणा पाटीवर दिसते.
सध्या उन्हाची तीव्रता खुप वाढली आहे.रखरखत्या उन्हात पाच मिनीट थांबणे म्हणजे जीवावर येते.परंतू इच्छितस्थळी जाण्यासाठी बसची वाट बघत कडक उन्हात थांबण्याशिवाय अन्य पर्याय ही नाही.वेळेत बस येईल आणि वेळेत घर गाठू,ही खुणगाठ मनाशी बांधुन उन्हात तळपत उभा असलेल्या प्रवाशांना आज पर्यंत कधीतरीच वेळेवर बस मिळाली.ती पण थांबा सोडून दुरवर थांबतात.अशी कुजबूज वाढवणा पाटीवर ऐकू येते.
किणी य.डांगेवाडी,वाढवणा खु.डाऊळ,हिप्परगा,सुकनी आदी वीस 1 गावातील हजारो प्रवाशांना लातुर, उदगीर,अहमदपुर,नांदेड,बिदरकडे ये-जा करण्यासाठी पाटीवर यावे लागते.आणि येथूनच जावे लागते.परंतू, प्रवाशांना थांबण्यासाठी पाटीवर निवारा नसल्याने हाॅटेल,दुकाण,टपरी,झाड यांचा आधार घ्यावा लागतो म्हणुन याबाबत वेळोवेळी आवाज उठविला तरीही या म्हत्वाच्या विषयाकडे कुणी पण लक्ष देत नसल्याने वर्षा नुवर्षापासुन उन,वादळवारे, पाऊस असे सर्व कांही सहन करत प्रवाशांना उभा राहावे लागते.आणि याची किव ना आमदार,खासदार असलेल्यांना आली,व ना एस.टी.च्या अधिका-यांना! तेंव्हा एखाद,दुस-या प्रवाशां चा जीव गेल्यावरच प्रवाशी निवाराशेड उभारणा का? अशी कुजबूज पाटीवरील प्रवाशी व व्यापा-यांत आहे.


0 टिप्पण्या