चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा - महाराष्ट्र शासन महसूल विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त विद्धमाने गांधी भवन पवनी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान नुकतेच संपन्न झाले.
कार्यक्रमाचे उदघाटन नगर परिषद पवनीच्या नगराध्यक्षा डॉ.विजया नंदूरकर यांचे हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार किशोर राऊत होते.तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार सुभदा धुर्वे,मतदार नोंदणी अभियानाचे चीफ नोडल अधिकारी सुनील मोटघरे,नगर परिषद पवनीचे उपाध्यक्ष सोनूभाऊ बावणकर,श्री.कापसे,पवनी तालुक्याचे सब रजिस्टार श्री.तोमर,भाजपाचे पवनी शहर अध्यक्ष संदीप नंदरधने आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
सदर शिबीर अभियानाच्या कार्यक्रमस्थळी शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्याकरिता स्टाल _लावण्यात आले होते.ह्यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.ह्याप्रसंगी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन नगराध्यक्षा_ डॉ. विजया नंदूरकर यांनी मार्गदर्शन करतांना केले.त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार किशोर राऊत यांनीसुद्धा विविध योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन अड्याळ मंडळचे मंडळ अधिकारी नत्थू शेंडे यांनी केले.तर उपस्थितांचे आभार पवनीचे ग्राम महसूल अधिकारी रंजित सव्वालाखे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता दोन्ही विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.


0 टिप्पण्या