चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :- कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये अशीच आपली भूमिका असून आपल्या मंत्रांलयाने ईडब्ल्यू सवलत जाहीर करून सर्व समाजाच्या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. उपवर्गीकरणाबाबत राज्याने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अजून प्राप्त झाला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच जाती-धर्माच्या लोकांना आरक्षण मिळणार असल्याने कोणावरही अन्याय होणार नसल्याचे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अकलूज येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी यावेळी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, नंदकुमार केंगार,मिलिंद सरतापे,किरण धाईंजे,जितेंद्र बनसोडे,सोमनाथ भोसले,दयानंद धाईंजे,प्रविण साळवे उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले, राज्यात एससी मध्ये ५९ जाती असून लोकसंख्येच्या प्रमाणात इतर जातींनाही आरक्षण मिळणार आहे. मात्र अनुसूचित जातीच्या जागा जनरलला देऊ नये अशीच आपली भूमिका असणार आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे भाजपला विजय मिळाला की तेथे ईव्हीएम चे नाव सांगितले जाते मात्र ते बरोबर नाही. ममता बॅनर्जींच्या राज्यात राजकीय हिंसाचार व महिलांवर अत्याचार वाढले होते ममताजींनी बंगाल कंगाल केले असल्याचे सांगत गत निवडणुकीत त्यांनी भावनिक साद घालून सत्ता मिळवली मात्र यावेळेस भाजपला यश मिळाले आहे.आपल्या पक्षाचा भाजपला चांगला फायदा होत असल्याने आपल्याला तिसऱ्यांदा राज्यसभा दिली आपण दिल्लीत असल्याने आपला पक्ष अनेक राज्यात वाढला आहे मणिपूर व नागालँड येथे आपल्या पक्षास मान्यता मिळाली असून पक्षास राष्ट्रीय म्हणून मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.
शासकीय वस्तीगृहाबाबत लक्ष घालू :
माळशिरस तालुक्यासाठी अकलूज येथील गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहाच्या बाबत विचारलेल्या प्रश्नास आपण यात नक्की लक्ष घालू अशी ग्वाही त्यांनी दिली.


0 टिप्पण्या