Ticker

6/recent/ticker-posts

रोजगार हमी वरील मजुरांच्या मजुरीत 5 रुपयांनी वाढ


• 1 जुलै पासून मजुरांना प्रती दिवस 317 रुपये मजुरी मिळणार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी :- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव बदलवून विकसित भारत रोजगार आजिविका मिशन ग्रामीण या योजनेमध्ये 1जुलै पासून रूपांतर करण्यात आली असून 1जुलै पासून मजूर प्रदान(अकुशल) कामांवर कार्यरत मजुरांच्या मजुरीत प्रती दिवस 05 रुपयाने वाढ करण्यात आली असून मजुरांना प्रती दिवस 312 ऐवजी आता 317 रुपये मिळणार आहेत. ही दरवाढ 1 जुलै  2026 पासून लागू होणार आहे. आर्थिक वर्ष 2026-27 पर्यंत ही दरवाढ अनुज्ञेय असल्याचे केंद्र शासनाने राजपत्राचे माध्यमातून जाहीर केले आहे. 
             ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना वर्षातून 125 दिवस रोजगार उपलब्ध करण्याचे उदात्त हेतूने केंद्र शासनाने व्हीबी जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आजिविका मिशन ग्रामीण या योजनेस सुरुवात केली आहे. या योजनेचा ग्रामीण भाग केंद्रस्थानी असल्याने गाव म्हणेल ती कामे ग्रामपंचायत तसेच  इतर बांधकाम एजेंसी च्या माध्यमातून केली असल्याने. ह्या योजनेचा केन्द्रबिंदू ग्रामीण परिसर असल्यामुळे कामांचे नियोजन देखरेख व सनियंत्रणाचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले आहे. ग्रामपंचायत अधिकारी यांच्या  मदतीस ग्रामसभेतून ग्राम रोजगार साहाय्यकाची निवड करण्यात आली असलेतरी ग्राम रोजगार साहाय्यक योजनेचा दुवा आहे. पंचायत समिती स्तरावर स्वतंत्र विभाग कार्यरत असून 25 लक्ष रुपयापर्यंत प्रशासकीय मान्यतेचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यास देण्यात आले आहेत. 
              महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत मजुरांकडून केल्या जाणाऱ्या कामांना अकुशल तर यंत्रसामग्रीने केल्या जाणाऱ्या कामांना कुशल कामे संबोधले जाते. या कामांचे प्रमाण 60 ला 40 ठेवणे बंधनकारक आहे. या योजनेतून वयक्तिक व सार्वजनिक लाभाची कामे केली जातात. 1 जानेवारी 2024 पासून केंद्र शासनाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी चे कामावर काम करणाऱ्या मजुरांचे दिवसातून पहिल्या पाळीत हजेरी व दुसऱ्या पाळीत छायाचित्र काढून ते रोजगार हमीच्या एनएमएमएस मोबाईल ॲप वर अपलोड करणे बंधनकारक केले आहे. यामुळे मजुरांची कामे यंत्राद्वारे करण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे. 
               महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना प्रती दिवस 312 रुपये मजुरी मिळत असे. सध्या जीवनावश्यक वस्तू व इतर वस्तूत भाववाढ झाल्याने महागाई वाढलेली आहे. त्यामुळे केंद्र शासनाने याची दखल घेऊन 1 जुलै 2026 पासून व्हीबी जी रामजी योजनेचे कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत प्रती दिवस 05 रुपये वाढ केली आहे. त्यामुळे आता 317 रुपये प्रती दिवस मजुरांना मजुरी मिळणार असल्याने गरीब मजुरांची थट्टा केली आहे.
*ग्रामीण परिसरात एनएमएमएस प्रणाली कुचकामी*
कामावर कार्यरत मजुरांची एनएमएमएस ॲप वर फोटो अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. पण ग्रामीण परिसरात नेटवर्क ची समस्या असल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच कामावर हजर मजुर ऑनलाइन हजेरीचा फायदा घेऊन मजूर हजेरी झाली की, कामावरून घरी पळून जात असल्यामुळे ग्राम रोजगार साहाय्यका पुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. 
*मजुरीबाबद संभ्रम*
 महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी चे कामावर कार्यरत मजुरांच्या मजुरीत 05 रुपयाने वाढ करून 317 रु.करण्यात आली असली तरी मोजमापानुसार मजुरी दिली जात नसल्यामुळे मजुरी बाबद संभ्रम निर्माण झाला असून रोजगार हमी काम कमी अशी भावना मजुरामध्ये तयार झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या