चित्रा न्युज प्रतिनिधी
हंडरगुळी :-दि.३ जुलै रोजी वाढवणा पो.स्टे.हद्दीतील हंडरगुळी येथील एका लिंबाच्या झाडा खाली तिर्रट नावाच्या जुगार अड्यावर ३.१५ वा.धाड टाकुन जुगाराचे साहित्य तसेच १७१० रु.चा माल हस्तगत केला असून या धाडीत ४ जुगा-यांवर पोहेकाॅ.शिवप्रताप रंगवाळ यांनी फिर्याद दिल्याने मुंजुकाप्रमाणे गुन्हा दाखल केला.आरोपी १)नागसेन गणपतराव मसुरे वय ४१ रा.हाळी (२) सचिन लोंढे वय २८ रा.हाळी (३) मस्के राजेंद्र शंकर वय ५० रा. हंडरगुळी (४) गिरजप्पा बाबुराव नवरखेले वय ४३ रा.हंडरगुळी ता.उदगीर हे राजेंद्र मस्के यांच्या दुकाना जवळील लिंबाचे झाडाखाली मोकळ्या जागेत वरील ४ आरोपींनी बेकायदेशीररित्या पत्यावर पैसे लावून तिर्रट (३पानी) जुगार खेळत व खेळवित असताना जुगाराचे साहीत्य व रोख १७१० रुपयासह मिळून आले म्हणुन वरील आरोपीविरुध्द गुरनं.कलम २०६/२६ क १२ (अ) मुंजुका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोकाॅ. ९६५ गाडगे हे करत आहेत.


0 टिप्पण्या