चित्रा न्युज प्रतिनिधी
लातूर :-हंडरगुळी ता. उदगीर येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हंडरगुळी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.१ जुलै २०२६ रोजी वन सप्ताह व वन महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक वनीकरण वनपरिक्षेत्र, उदगीर यांच्या वतीने दि. १ जुलै २०२६ ते दि. ७ जुलै २०२६ या कालावधीत वन महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त हाळी व हंडरगुळी गावातून वृक्षदिंडी काढण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले.
शाळेचे मुख्याधापक डी. एम. तांबरे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी वृक्षदिंडीचे उद्घाटन केले. तसेच वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्व सांगितले. या वृक्षदिंडीचे आयोजन व नियोजन विद्यालयाचे पर्यवेक्षक (स्काऊट मास्टर )सुगावे बी. सी. व क्रीडा शिक्षक आर. जी. जाधव यांनी केले.
"झाडे लावा, झाडे जगवा", वृक्षांची कराल रक्षा, तरच होईल मानवाची सुरक्षा, वृक्ष आहे पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होईल प्रदूषण, वृक्षतोड करू नका, जीवन धोक्यात टाकू नका, वृक्ष लावू दारोदारी, पर्यावरण राखू घरोघरी. या घोषवाक्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी सामाजिक वनीकरण विभाग उदगीर वनपरिक्षेत्राचे वनपरिमंडळ अधिकारी एन. आर. शेलार, वनरक्षक आर. डी. चव्हाण, पी.एम. टेकाळे, के.बी.आडे, अशोक हजारे, एस. जी. हेंगणे, एस. जी. काकनाटे, ए. एस. कांबळे, व्ही. पी. चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्त्व विशद केले.
प्रा. संजय गायकवाड, ए. एस.मोमीन, व्ही. एस. कणसे टी. एस. बगाडे, सौ. के. के. बिरादार, सौ. के.व्ही. येलाले, सौ.एस. एन. कुरुळेकर, वैभव कासले, मळभागे शिवानंद, माधव वाघमारे यांच्यासह विद्यालयातील सर्व विद्यार्थी, पालक, गावातील युवक, युवती या उपक्रमात मोठ्या सहभागी झाले होते. हाळी हंडरगुळी गावातून सवाद्य वृक्षदिंडी काढण्यात आली. या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


0 टिप्पण्या