Ticker

6/recent/ticker-posts

पवनी येथील संजाना उर्दू शाळेत ‘सुरक्षित बालपण अभियान’ संपन्न


 चित्रा न्युज प्रतिनिधी 
पवनी :-नगर परिषद संजाना डिजिटल उर्दू उच्च प्राथमिक स्कूल, पवनी येथे  दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘सुरक्षित बालपण अभियान’ मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना यावेळी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये गुड टच - बॅड टच (चांगला स्पर्श - वाईट स्पर्श) ओळखणे, सायबर सुरक्षा, बाल हक्क आणि संकट काळात स्वतःचे संरक्षण कसे करावे, याचा समावेश होता.

विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, योग्य-अयोग्य स्पर्शाची जाणीव करून देणे, इंटरनेट व मोबाईलचा सुरक्षित व योग्य वापर कसा करावा आणि आपल्या हक्कांबद्दल माहिती देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.मुख्याध्यापक शाहरुख सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षिका यास्मीन मॅडम, हातीफ शेख सर, रिजवानुद्दीन सर इत्यादींनी
 परिश्रम घेतले.

सुरक्षित बालक - सुरक्षित भविष्य! या संदेशाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या