Ticker

6/recent/ticker-posts

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना व स्वतंत्र कालम देण्यात यावा याकरिता


जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा


 चित्रा न्यूज प्रतिनिधी 
भंडारा- ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना  करण्यात यावी व ओबीसीचा समाजाचा जनगणनेत स्वतंत्र कालम देण्यात यावा, या प्रमुख मागणी करिता बावणे कुणबी सभागृह गांधी चौक भंडारा येथून  जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य  मोर्चा काढण्यात आला . या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमूर्ती चौकात सभेत रूपांतर झाले .मोर्चात प्रमुख मागण्या अनुसूचित जाती जमाती प्रमाणे ओबीसीच्या स्वतंत्र कालम देण्यात यावा, ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी ,लोकसंख्येच्या आधारावर बजेटमध्ये तरतूद करण्यात यावी ,स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा ,शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, बोनस, प्रति हेक्टर २५००० हजार रुपये देण्यात यावे, सर्व शेती पंपांना 24 तास मोफत विज विज पुरवठा देण्यात यावा, सरकारी शाळा बंद न करण्याच्या निर्णय मागे घेण्यात यावा, शाळांना सर्व सोयी सुविधा व शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावे,नोकरी शिक्षणात खुला प्रवर्ग सर्वासाठी खुदा करावा, क्रिमिअरची ची अट रद्द करण्यात यावी, परीक्षेतील सावळागोंध दूर करण्यात यावा, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्यात यावे, 2026 /27 मध्ये ओबीसी करता स्वतंत्र कालम जनगणने करिता देण्यात यावा इत्यादी मागण्याचा समावेश आहे. यावेळी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे ,माजी आमदार चरण वाघमारे, सदानंद इलमे, भगीरथ धोटे ,रोशन उरकुडे, गोपाल सेलोकर, मंगला वाडीभस्मे,माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्ण, यांनी मोर्चाला संबोधित केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरता फुलचंद रामटेके ,खुशाल रामटेके ,पंजाबराव कारेमोरे ,अनिता बोरकर ,सुभदा झंजाळ, ललिता देशमुख ,लता बोरकर, जयश्री बोरकर ,अंजली बांते ,मनोज बोरकर,महेंद्र मेंढे ,विष्णू जगनाडे ,दिनेश शिरपाते, मुकुंदा पाचे ,दिलीप चोकर, प्रभाकर वैरागडे, रोशन उरकुडे,यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन ओबीसी समाजाचे नेते डॉ. बाळकृष्ण सार्वे यांनी केले. प्रास्ताविक सदानंद इलमे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या