Ticker

6/recent/ticker-posts

निलागोंदी येथे बिरसा मुंडा जयंती साजरी


लाखनी (श.प्र.):-तालुक्यातील निलागोंदी येथे बिरसा मुंडा समिती, निलागोंदी यांच्या आयोजनातून क्रांतिकारी जननायक, धरती आबा बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळपासूनच गावात उत्सवाचे वातावरण होते. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.यावेळी बिरसा मुंडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राणी दुर्गावती यांच्या फोटोला पुष्पहार घालण्यात आले व अभिवादन करण्यात आले. यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात व घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन सर्वांनी त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प केला.
              यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक पंचायत समिती सदस्य गिरीशभाऊ बावनकुळे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सौ. वर्षाताई वंजारी यांच्या उपस्थितीत उपसरपंच श्री. महेश हटवार, ग्रा.पं. सदस्य दिनेश वंजारी, ग्रा.पं. सदस्य छत्रपती हटवार, ग्रा.पं. सदस्या प्रियती वरठे, ग्रा.पं. सदस्या विद्या हटवार, महेश हटवार तुमसर नागरी पत संस्था लाखनी, तमुस अध्यक्ष धनपाल हटवार, राजेंद्र नागदेवें रक्तपेढी सामान्य रुग्णालय भंडारा, शैलेश वंजारी शाळा समिती उपाध्यक्ष, वैभव हटवार बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक, तमुस उपाध्यक्ष एकनाथ हटवार, माजी तमुस अध्यक्ष यशोराज हटवार, माजी तमुस उपाध्यक्ष सुभाष हटवार, माजी उपसरपंच प्रियंका भुरे, तोरणा वंजारी अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.तसेच दिलहर वरठे, शिशुपाल मरस्कोले, राहुल उईके, शिशुपाल वरठे, प्रभाकर सयाम, जयदेव सयाम, लव काळपते, पारस सयाम तसेच इतर आदिवासी बांधव व महिलांनी जयंती कार्यक्रमाला सहकार्य केले. या कार्यक्रमाचे संचालन सौरभ मरसकोले यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केले. त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थितांची मने जिंकली.
               मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ बावनकुळे यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन गौरव कार्याचे भाष्य केले. ते म्हणाले, केवळ २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. जल-जंगल-जमीन वाचवण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज आदिवासी समाजाला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा मिळते.पुढे बोलताना त्यांनी निलागोंदी गावातील सर्व जातीधर्माचे लोक एकत्रित येतात याबाबत निलागोंदी गावाचे कौतुक केले. ते म्हणाले, निलागोंदी गावात प्रत्येक सण-उत्सव सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन साजरा करतात. हीच या गावाची खरी ओळख आहे आणि ही एकता अशीच कायम राहावी. गावातील ही एकजूट इतर गावांसाठी आदर्श आहे.वर्षभर बिरसा मुंडा पुतळ्याची स्वच्छता ठेवून दीप प्रज्वलित ठेवल्याने सौ. मंजुळाबाई कळपते यांचा शाल, श्रीफळ व साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या निस्वार्थ सेवेबद्दल सर्वांनी कौतुक केले.
                बिरसा मुंडा समितीने केलेले कार्य कौतुकास्पद असून पुढील काळातही असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यात येतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाला गावातील महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या