Ticker

6/recent/ticker-posts

गुंजाऱ्यात अमली पदार्थाच्या साठेबाजीवर कारवाई


तीन आरोपींना अटक : ११,१० लाखांचा मुद्देमाल जप्त

          
मदन कमाने. 
भंडारा:- जिल्ह्याचे लाखनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे तसेच अमली पदार्थाची विक्री होत असल्याने युवा पिढीचे सेवन वाढले आहे.  यामध्ये अवैध रेती तस्करी,  सट्टापट्टी जुगार,   दारूची वाहतूक आणि विक्री अशा प्रकारचे अवैध व्यवसायाकांचे तालुक्यात मोठे जाळे पसरले असून पालांदूर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये स्थानिक पोलीस तसेच उपविभागाकडून आणि जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून काही प्रमाणात कारवाया सुरू आहेत .  मात्र लाखनी पोलीस स्टेशनचे हद्दीत स्थानिक उपविभाग आणि जिल्हा स्थानिक गुन्हे पथकाकडून कारवाई होत नसल्याने लाखनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांनी उच्चांक गाठला असल्याने या पोलीस स्टेशनचे हद्दीतील मध्यवर्ती गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे तसेच रस्त्याने अवैध रेतीचे ट्रॅक्टर सुसाट वेगाने धावताना दिसतात.  असे असले तरी कारवाई मात्र अल्प स्वरूपात केल्या जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.   लाखनी पोलीस स्टेशनचे हद्दीतील प्रत्येक गावांमध्ये पोलीस पाटील तैनात असून बीट स्तरावर बीट अंमलदार आणि त्यांचे सहाय्यक
कार्यरत आहेत.   तसेच अधिकारी स्वरूपात पोलीस निरीक्षक पोलीस,  पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक ही अधिकारी पदे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत.   असे असले तरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून  प्रोढ,  युवा, बेरोजगार,  शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि मजूर इत्यादी व्यसनाधीन होऊन व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत.   हद्दीत गस्त दिसत असली तरी दोस्तीच्या  आड नेमकं दडलं तरी काय ?  याबाबत नागरिकांमध्ये शंका कुशकांचे पेव फुटले आहे.  अवैध दारू विक्री महामार्गावरील ढाबे, चौकातील हॉटेल,  आणि गल्लीबोळीत केव्हाही,  कुठेही,  आणि कुणालाही सहज दारू उपलब्ध होत असल्याने अपघातांच्या प्रमाणात अपघात भुरट्या चोऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.   याही पुढे जाऊन गांजा,  अफीम, आणि डोडा यासारखे अमली पदार्थांची मुबलक उपलब्धता आणि विक्री वाढल्याने  युवा पिढीला सहज उपलब्ध होत आहेत.
       याचे ताजे आणि जिवंत उदाहरण म्हणजे 13 नोव्हेंबर चे दुपारी  ३.०० वाजे  गुंथारा येथे स्थानिक गुन्हे शाखेचे एन.डी. पी.एस. पथकाने गुप्त माहितीच्या आधारावर टाकलेल्या धाडीतून चक्क लाखनी पोलीस स्टेशन च्या हद्दीत चालत असलेल्या अवैध धंद्याचे पितळ उघडे पडले. 
       स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे एन डी पी एस पथक जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन,  अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि स्थानिक  गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनात पथक गस्तीवर असताना गोपनीय माहितीच्या आधारावर गुंथारा येथील विलास मोरेश्वर ढेंगे  गुंथारा यांचे घरी अमली पदार्थ असल्याची माहिती कळली त्या माहितीचे आधारावर आरोपी  १) विलास मोरेश्वर ढेंगे.  वय 43 वर्ष  राह.  गुंथारा याने त्याचे राहते घरी अवैधरित्या अमली पदार्थ डोडा भुक्टी बाळगून ठेवल्याने त्याचे सह आरोपी २) प्रफुल्ल उर्फ सोनू निंबार्ते.  वय 32 वर्ष राह. गुंथारा यांना ताब्यात घेऊन आरोपी (१) क्रमांक यास मिळालेल्या मुद्देमाला बाबत  विचारपूस केली असता त्याने सदर सदरचा मुद्देमाल हा आरोपी क्र. (३) रामराम गंगाराम चौधरी वय अंदाजे 37 वर्ष हल्ली मुक्काम चौधरी राजस्थानी ढाबा राह. दिघोरी/ आम. यांचे मालकीचा असल्याचे सांगितले.. त्यामध्ये आरोपी क्रमांक  १, २, ३ यांना ताब्यात घेऊन त्यांच्या अंग झडती व घरझडती मधून १५.४०६  किलोग्राम अमली पदार्थ अफु डोडा भुक्टी किंमती ३,०८,१२०  रु. अँड्रॉइड मोबाईल किमती ४५,०००/- रुपये,  एक चार चाकी बोलेरो पिकप,  एक मोटर सायकल ७,५०,०००/-   दोन मिक्सर ग्राइंडर व पाॅट किमती ३८०० रुपये दोन दोन वजन काटे किंमत 3700/- असा एकूण. ११,१०,६२०/- रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र लांडे यांचे तक्रारीवरून लाखनी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक - ५५६/२०२६ कलम-  ८(c), १५(b) २९  NDPS ACT गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
      या मोठ्या कारवाईने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून ही कारवाई स.पो.नी. रवींद्र लाडे,  पोलीस हवालदार कृष्णकुमार बोरकर,   साजन वाघमारे, पोलीस शिपाई तेजस्विनी लिल्हारे,  प्रमोद आरीकर, आणि दिनेश घोलपे यांनी कारवाई केली असून पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या