Ticker

6/recent/ticker-posts

१५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा चौकाचे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर उद्घाटन

हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे बिरसा फायटर्सचे आदिवासी बांधवांना आवाहन

चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा  : आदिवासी समाजाच्या अस्मिता, स्वाभिमान आणि एकजुटीचे प्रतीक म्हणून मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा चौक उभारण्यात येणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शहाणे बर्डी, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे या चौकाचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन बिरसा फायटर्स महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हा केवळ जन्मदिवस नसून अन्यायाविरुद्ध लढण्याची, स्वाभिमानाने जगण्याची आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. याच विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भगवान बिरसा मुंडा यांच्या नावाने चौक उभारण्याचा उपक्रम बिरसा फायटर्सने हाती घेतला आहे.
                    या उद्घाटन सोहळ्याला बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे, मार्गदर्शक चंद्रसिंग पवार, महाराष्ट्र राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, सचिव सुनील दळवी, कार्याध्यक्ष बिरबल पावरा, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, सामाजिक कार्यकर्ते संजय भोसले, गजानन ब्राह्मणे, रील स्टार गोविंद शितोळे, मध्यप्रदेश अध्यक्ष विजय बरडे, पानसेमल अध्यक्ष मांगिलाल सेनानी, नंदुरबार जिल्हाध्यक्ष हिरामण खर्डे, शहादा तालुकाध्यक्ष संतोष वळवी, धडगाव तालुकाध्यक्ष सुनील तडवी, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष दिनेश वसावे, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी, नाशिक विभागीय अध्यक्ष विजय पावरा, उपाध्यक्ष धनायुष भंडारी, नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडनीस, पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी, विदर्भ अध्यक्ष सोयाम, धुळे जिल्हाध्यक्ष ईश्वर मोरे, शिरपूर तालुकाध्यक्ष नगीनदास पावरा आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तसेच शहाणे गावाचे पोलीस पाटील कुर्बान भंडारी, सरपंच लक्ष्मीबाई पाडवी यांच्यासह महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील अनेक आदिवासी सामाजिक कार्यकर्ते व समाजबांधव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
                 भगवान बिरसा मुंडा चौक हा केवळ सिमेंट-काँक्रीटचा चौक नसून दोन राज्यांतील आदिवासी समाजाला जोडणारा एकतेचा सेतू ठरणार आहे.या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील हजारो आदिवासी बांधवांनी उपस्थित राहून समाजाच्या एकजुटीचा नवा इतिहास घडवावा, असे जाहीर आवाहन बिरसा फायटर्स महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी आणि बिरसा फायटर्स मध्यप्रदेशचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष विजय बरडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या