चित्रा न्युज प्रतिनिधी
वैजापूर : वैजापूर येथे भीमसैनिक रोहित पठारे यांची जातीयवादी मानसिकतेतून कट रचून मारहाण करून हत्या करण्यात आले. या प्रकरणातील पठारे कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे, तसेच कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने समाजकल्याण सहआयुक्तांना देण्यात आले. रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत तातडीने उपलब्ध करून देऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष राहुल मकासरे, अभिमन्यू अंभोरे, मिलिंद जमधडे, पवन चव्हाण आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या