दुसऱ्या दिवशीही माहूर शहर कडकडीत बंद
श्रीक्षेत्र माहूर :-माहूर शहरात हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विनापरवानगी डीजे वाजवून धार्मिक भावना दुखावणारे गाणे वाजविल्याने गुन्हा दाखल करून माहूर बंद ठेवण्यात आले होते तर दि 22 रोजी रात्री हजरत टिपू सुलतान यांचे बॅनर फाडल्याने तिघा विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून याचा निषेध म्हणून सोमवारी ही माहूर बंद ठेवण्यात आल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते त्यानिमित्त माहूर पोलीस ठाण्यात शांतता बैठक घेण्यात येऊन पोलीस प्रशासनाने विनंती केल्याने माहूर शहराची व्यापार पेठ पूर्वत सुरळीत झाली
माहूर शहरात गेल्या तीन दिवसापासून हजर टिपू सुलतान जयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी डीजे वाजविल्या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याने वातावरण तंग बनले होते तर शहरात हजरत टिपू सुलतान यांचे बॅनर लागलेले होते रविवारी बाजारपेठ बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला परंतु काही माथे फिरूनि हजरत टिपू सुलतान यांचे बॅनर रविवारी रात्री फाडल्याने शहरात अघोषित बंद पाळण्यात आला होता त्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन समाज मन दुखावले गेले असल्याने भोकरच्या अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी माहूर पोलीस ठाण्यात येऊन उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेऊन यामध्ये सर्व व्यापारी सर्व पक्षीयांना बोलावून सक्त सुचना देत यापुढे कुठल्याही प्रकारचा स्पीकर माईक किंवा डीजे वाजविण्यास पूर्णत बंदी घालण्यात आली असून पोस्टर पताके झेंडे बॅनर शहरात लागणार नाही व्यापारी संघटना जोपर्यंत कुठल्याही बंदला परवानगी देत नाही त्यानंतर पोलिसांची परवानगी होत नाही तोपर्यंत कुठल्याही बंद पाळण्यात येणार नाहीत बंद पाळल्यास फक्त अर्धा दिवस बंद पाळण्यात येतील फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम या सह इतर सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट परवानगी घेतल्याशिवाय टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल कुठल्याही व्यावसायिक वैयक्तिक सांस्कृतिक राजकीय विवाह वगैरे समारंभात कुठलेही कर्कश् वाद्य लावण्यात येणार नाहीत लावल्यास परवानगी घेऊन लावावे व एक दिवस आधी त्याची पोलिसांकडून खातरजमा करून घ्यावी बंद आंदोलन मोर्चा उपोषण तसे इतर वैयक्तिक कार्यक्रमासाठी जोपर्यंत पोलीस परवानगी देत नाहीत तोपर्यंत कार्यक्रम घेऊ नये तसेच माहूर शहरासह इतर कुठल्याही गावात कुठल्याही मिरवणुकीसाठी जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत मिरवणुका काढू नये किंवा कुठलेच वाद्य वाजवू नयेत अशा सक्त सूचना देण्यात आल्या तसेच माथे फिरूंना पाठबळ देणाऱ्यांच्या मोबाईलचा सीडीआर काढून त्यांचे विरुद्ध ही कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला
यावेळी अनेक मान्यवरांनी याबद्दल आपले मत मांडले परंतु आता पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याने डीजे लावून मिरवणूक काढण्याचे स्वप्न बघणारे सोशल मीडियावर उठ सूट पोस्ट टाकणारे विनापरवानगी बॅनर लावणाऱ्या च्या स्वप्नावर विरजण पडले आहे


0 टिप्पण्या