जयकुमार अडकीने तालुका प्रतिनिधी माहूर जि.नांदेड मो.9623410732
माहूर:- नांदेड जिल्ह्यातील माहूर निकट च्या धनोडा येथील पैनगंगा नदीला पुर आल्याने रस्ता बंद झाला असून वाहतूक थांबल्याने विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला आहे. दरम्यान तहसीलदार किशोर यादव यांनी माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिर अतिवृष्टीच्या पार्भूमीवर भाविकांना दर्शनासाठी पुढील आदेशा पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
माहूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे, आज बुधवारी सकाळ पर्यंत तालुक्यात 86.46 मिली मीटर एवढा पाऊस पडला आहे. माहूर तालुक्यातील वानोळा,
दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी नदी काठच्या गावात व शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले.पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली आहे. दरम्यान तहसीलदार किशोर यादव पोलीस निरीक्षक नामदेव यांनी पाहणी केली असून पुर परिस्थिती मध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी या भागात पोलिसांची गस्त सुरू केली आहे. नागरिकांनी पूर बघण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन ही पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान तहसीलदार किशोर यादव यांनी नांदेड सह पूर्ण महाराष्ट्र मधे अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला असल्याचे कोणतीही आपत्ती घडू नये या साठी नागरिकांनी आपल्या घरी सुरक्षित राहावे असे अहवान करत माहूर गडावरील रेणुका देवी मंदिर पुढील आदेश पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्यात चा निर्णय घेतला आहे.


0 टिप्पण्या