Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टी व ढगफुटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ अर्थसहाय्य करा !गुंडवळच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन


 जयकुमार अडकीने तालुका प्रतिनिधी माहूर जि.नांदेड 

माहूर-  दि. ६ जुलै २०२२ पासून सुरु असलेल्या सत्तधार अतिवृष्टी व ढगफुटीने माहूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या  प्रमाणात नुकसान झाले असून मौजे गुंडवळ येथेही गरुडगंगा नाल्याला आलेला महापुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. झालेल्या नुकसानीने हतबल होऊन धायकुतीला आलेल्या मौजे गुंडवळ येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यानी तहसीलदार माहूर यांचे मार्फत  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  पाठविलेल्या निवेदनात तातडीने नुकसान भरपाई अर्थसहाय्य  देण्याची  मागणी केली आहे. 
         मौजे गुंडवळ ता. माहूर जि. नांदेड येथे  दि. ६ जुलै ते १३ जुलै च्या अतिवृष्टी ( ढगफुटी) पावसामुळे  मौजे गुंडवळ शिवारात असलेल्या गरुडगंगा नाला फुटल्यामुळे शेतातील उभी असलेली पिके कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद, मुग इत्यादी पिके वाहून गेली व  उपयोगी असलेली शेती ही खरडून गेल्याने शेती ही खंडर झालेली आहे व शेतात असलेले शेतीउपयोगी साहित्य वखर, डवरे, कोळपे, सरते, तुषारसंच, विद्युत मोटरपंप, फवारणीचे पंप व इतर काही साहित्य वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर आज रोजी उपासमारीची वेळ आलेली आहे. निवेदनाची तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन आम्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या  शेताची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी विनंती केली आहे. माहूर तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार व्ही.टी. गोविंदवार यांना सदर निवेदन सादर करतांना शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाईक, माकप. चे  जिल्हा कमेटी पदाधिकारी कॉ. किशोर पवार, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप जमदाडे, सुमेरसिंह ठाकूर, धर्मा राठोड उदलसिंह लालछोटे  आदि उपस्थित होते.  निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तालुका कृषी अधिकारी माहूर यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर रेखाबाई जमदाडे, कल्पनाबाई जमदाडे, आकाश जमदाडे, उदलसिंह लालछोटे, यशोदाबाई लालछोटे जयकुमार अडकीने, कमलाबाई ठाकूर वंसता कांबळे, वसंत हनवते, नथ्थू पाईकराव, अर्जुन जाधव, उत्तम जाधव, हनुमानसिंह धनावत, शेख गफार शेख बाबू  आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या