Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीने नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना तातडीने नुकसान भरपाई द्या – डॉ.केशवे


डॉ. निरंजन केशवे यांनी दिल्या  नुकसानग्रस्त  गावांना भेटी

जयकुमार अडकीने तालुका प्रतिनिधी माहूर जि.नांदेड  9623410732

माहूर- दि. ६ जुलैपासून ते आजतागायत सुरु असलेल्या सत्ततधार अतिवृष्टीने माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी व इतर छोट्या मोठ्या नाल्यांना आलेल्या महापुराने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्याने व शेतातील पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यावर ओढवलेल्या तीव्र अस्मानी संकटाची तातडीने दखल घेऊन युवक कॉंग्रेस वैद्यकीय सहाय्यता आघाडीचे राज्य समन्वयक डॉ निरंजन केशवे यांनी  पैनगंगा नदीच्या तीरावरील व छोट्या मोठ्या नाल्याच्या काठावरील गावात जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन सांत्वन करीत धीर दिला.
              शासनामार्फत  तातडीने अर्थसहाय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यास बांधील असून शेतकऱ्यांना अडचणीत मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यास युवक कॉंग्रेस अग्रेसर राहील अशी ग्वाही देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

               नुकसानग्रस्त भागातील दौऱ्यामध्ये डॉ. केशवे यांनी  पैनगंगा नदीकाठावरील वडसा, पडसा, टाकळी, लिंबायत, नेर, लांजी, शेकापूर , केरोळी, रुई, हडसनी, हिंगणी दिगडी, कु, आदि गावात जाऊन शेतकऱ्यांच्या शेतातील  झालेल्या  पिकांची व खरडून गेलेल्या शेतजमिनीची पाहणी केली. तर छोट्या मोठ्या नाल्या ओढ्याकाठावरील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करीत माहूर तालुका पिंजून काढत आहेत.  यावेळी डॉ. निरंजन केशवे यांनी झालेल्या नुकसानीची तीव्रता प्रत्यक्ष पाहून अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या