Ticker

6/recent/ticker-posts

पूरप्रवण गावांमधील नागरिकांना सतर्कतेच्या सूचनाजिल्हाधिकारी नयना गुंडे

                                                                         नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज 


गोंदिया: गेल्या 24 तासात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व भारतीय हवामान विभागाने दिलेला ऑरेंज अलर्ट, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

         सध्या सर्वदूर पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील नदीकाठच्या व पूरप्रवण 96 गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा, वेळोवेळी आपत्ती विषयक असणारी माहिती तहसीलदारांनी गावकऱ्यांपर्यंत पोहोचवावी. आवश्यक कामाशिवाय नागरिकांनी प्रवास करणे टाळावे तसेच पाऊस पडत असताना पूलांवरून वाहनांद्वारे वाहतूक करणे टाळावे. जिल्ह्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत आहेत. मात्र नदीकाठच्या गावांमधील गावकऱ्यांना वाढलेल्या पूर पातळीची कल्पना वेळोवेळी तहसीलदारांनी पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे द्यावी.

         इटियाडोह व संजय सरोवर परिसरात संततधार पाऊस होत असल्याने दर तीन तासांनी पाणी पातळीच्या बाबतीतील अद्ययावत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त होत आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी सजग व संपर्कात रहावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
                                                                                      अफवांवर विश्वास ठेवू नये

आपत्ती संदर्भातील कोणतीही माहिती असल्यास तातडीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावी. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे की, नागरिकांनी पूर आपत्ती याबाबतीतील अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातील दूरध्वनी क्रमांक 07182-230196 वर संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या