Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा येथे संविधान दिन साजरा

रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५

भंडारा :- आज २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान / भारतीय राज्यघटना दिन म्हणून साजरा केला जातो. जीवन भजनकर 
ओबीसी क्रांती मोर्चा
भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्याव भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्यान अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून २६ नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. ऑगस्ट २९ १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो.नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "भारतीय प्रजासत्ताक दिन" म्हणून साजरा केला जातो. 
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून साजरा केला जातो. 
कार्यक्रमाच्या वेळी ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष् संजय मते, यशवंत सुर्यवंशी कल्याणी मते नागदेवे ताई, नचिकेत मते, हेमाताई गजभिये याशिका घोडीचोर आणि छोटे शालेयनी विदयार्थी उपस्थित होते. जय संविधान, जय ओबीसी घोषणा देत संविधान दिन साजरा करण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या