Ticker

6/recent/ticker-posts

नवजीवन तान्हा पोळा समिति भद्रावतीचा आकर्षक सुवर्ण महोत्सव संपन्न.



चित्रा न्युज प्रतिनिधी 
भद्रावती :  देवनागरी भद्रावती येथिल विठ्ठल मंदिर परिसरात भरणारा तान्हा पोळा हा मानाचा पोळा असुन याही वर्षी हा सोन्याचा पोळा म्हणून 
संपूर्ण भद्रावतीत आकर्षणाचा विषय ठरला होता. 
 नवजीवन पोळा समितिचा सुवर्ण महोत्सव.१९७६ पासुन तान्हा पोळ्यानिमीत्त लहान बालकांना ईनामी कुपण योजनेद्वारे समिति
बक्षिस वाटप करीत असते.या वर्षी सुवर्ण महोत्सव निमित्त ५ ग्रॅम सोन्याची चैन कु.गौरी रविन्द्र शिंदे कडुन, दुसरे बक्षिस लैपटाप समिति कडुन,तिसरेबक्षिस इलेक्ट्रॉनिक बेबी जीप नकुल प्रशांत शिंदे तर्फे, चौथेबक्षिस LED TV 32 " रामकृष्ण पत्तिवार पाचवे बक्षिस बेबी बाइक छाया ज्वेलर्स संचित राॅय सहावे बक्षिस5G Redmi मोबा.प्रा. संजय लांबे स्व.ताई चौधरी स्मृ.प्रि.व मराठा मोबा.शाॅपी, सातवें बक्षिस शिलाईमशीन निलेश गुंडावार किराणा आठवे बक्षिस रेंजर सायकल संजय गुंडावार प्रदिप गुंडावार नववे ड्रेसिंग टेबल गौरीप्रसन्न साहा एंटरप्राइजेस दहावे होम थिएटर आशिष मोबा शापी,११ वे चांदीचा गणपति नागेन्द्र चटपल्लीवार बाळु उपलंचीवार व गोपाल गोसवाडे,१२ वे प्रोत्साहन बक्षिस ११००/- ₹ रोख श्री अनंता देवईकर तर्फे. आकर्षक बक्षिसांची भव्य लयलुट असल्यामुळे लहानबालक युवकयुवती महिला व संपूर्ण भद्रावतीकरांना बक्षिसांनी मोहित केले होते. विठ्ठल मंदिर परिसरातील रस्ते गर्दीने फुलुन गेले होते. डिजिटल स्क्रीन द्वारे दुरच्या प्रेक्षकांना जवळुन हा महोत्सव पाहता येत होता.
     गेल्या पन्नास वर्षापासुन या पोळ्याची परंपरा सुरु असल्यामुळे समितिच्या दिवंगत सभासदांना व परीसरातील दिवंगत प्रतिष्ठित नागरीकांना समिति तर्फे श्रद्धांजली अर्पित करुन या महोत्सवाची सुरुवात करण्यात आली.समितीचे काही सदस्य बाहेरगावला स्थायीक झाल्यामुळे या सुवर्ण महोत्सवाला ऊपस्थित झाले होते. तेच या महोत्सवाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. यात प्रामुख्याने सर्वश्री प्रा. संजय लांबे  (ब्रम्हपुरी), अनंता देवईकर ( नागपुर)व संतोष गुंडावार वरोरा प्रामुख्याने ऊपस्थित झाले होते. या महोत्सवाला स्थानिक प्रतिष्ठित नेत्यांनी सदिच्छा भेट दिली होती समिति तर्फे त्यांचाही स्वागत सत्कार करण्यात आला.स्थानिक संस्थापक सदस्य कार्यकारिणी सदस्य व युवा सदस्य यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतिने नियोजन करुन नंदीबैल घेवुन येनाऱ्या प्रत्येक बालकांस चाॅकलेट्स व लंचबॉक्स वाटप करुन त्यांचा उत्साह वाढविला. शेवटी लकी ड्रा द्वारा लकी नंबर्स काढुन भाग्यवंतांना बक्षिसं वाटप करण्यात आले. या महोत्सवाला व्यापारी वर्गाने स्वेच्छेने बक्षिसं पुरविली काही व्यापारी वर्गाने स्वेच्छेने शुभेच्छा फलकं लावुन शुभेच्छा दिल्या, परीसरातील जेष्ठ नागरिक व संपूर्ण नागरीकांचे व समितिच्या संपूर्ण सदस्यांचे आभार व्यक्त करुन महोत्सवाची समाप्ती करण्यात आली. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी संपूर्ण सदस्यांचे योगदान आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या