Ticker

6/recent/ticker-posts

सर्व नाभिक समाज बांधवांनी ऐकत्र येवुन आपल्या एका विधवा भगिनीला न्याय मिळवून देऊया

चित्रा न्युज प्रतिनिधी 
चंद्रपुर : झाशी राणी चौक, बल्लारपूर येथील नाभिक समाजाचं पारंपरिक सलून दुकान  स्व. विजयराव हरिभाऊ लक्षणे यांच्या नावावर ४०-५० वर्षांपासून चालू होते. त्यानंतर स्व. अरविंद लक्षणे  यांनी चालविले होते. अरविंद यांच्या निधनानंतर गेल्या एक वर्षापासून दुकान बंद आहे. त्यांच्या पत्नीने अत्यंत हालअपेष्टा सहन करत दुकान चालवायचा प्रयत्न केला, पण परिस्थितीमुळे ते बंद राहिलं.व त्यांना ते दुकान चालवने जमले नसल्याने,
त्यांनी ते दुकान किरायाने देऊन चार पैसे मिळेल या उद्देशाने ते दुकान किरायाने देण्याचे ठरविले असता, शेजारी राहणारे जांभुळकर काकू यांनी व दुकानामागे असलेले रामटेके यांनी ते दुकान किरायाने  देण्यास विरोध केला, व जांभुळकर काकू व रामटेके यांनी शीतल अरविंद लक्षने यांना त्यांच्या राहते घरी जाऊन धमकी दिली की,जर हे दुकान किरायाने दिले तर याचे वाईट परिणाम होईल असे ते शीतल अरविंद लक्षणें यांच्या घरी येऊन धमकी दिली,  तरी त्यांच्या धमकीला न घाबरता शीतलताई यांनी दुकान किरायाने दिले असता ते दुकान पूर्वता सुरु होन्याच्या अगोदरच  त्या धमकी देणाऱ्यांनी रात्री फोडून दुकानाची नासधुस केले. दुकान बंद अवस्थेत असल्याचा या वरील दोन  ईसमानी गैरफायदा घेत
शेजारी राहणाऱ्या रामटेके यांचे जावई पवन भगत नावाचा व्यक्ती पुढे येतो आणि दावा करतो. की "ही जागा माझ्या सासऱ्याची आहे!" पण यामधील सत्य काय आहे? या दुकानाचा कायदेशीर टॅक्स आजही स्व. विजय लक्षणे यांच्या नावानेच येतो! कोणतीही मालकी हक्काची नोंद किंवा कागदपत्रे त्या व्यक्तीकडे नाहीत!
हा प्रकार म्हणजे संपूर्ण नाभिक समाजाच्या स्वाभिमानावर घाला आहे!आपल्या समाजातील एक विधवा माता आणि दोन चिमुकल्या मुलांच्या न्याय हक्कासाठी आपण सगळ्यांनी या विधवा भगिनीच्या मदतीला एकत्र आलो पाहिजे! तर आपण सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन  गुरुवार – 7 ऑगस्ट 2025 ला सकाळी 10:30 वाजता तहसील कार्यालय, बल्लारपूर येथे हा लढा एका दुकानासाठी नाही – हा लढा आपल्या नाभिक समाजाच्या श्रम, प्रतिष्ठा आणि हक्कासाठी आहे! सर्व नाभिक बांधवांनी कोणताही गटतट न बघता ठरलेल्या वेळेला हजर राहावे असे आवाहनकर्ते: जय जिवाजी क्रांती सेना महाराष्ट्र राज्य
देवेंद्रजी वाटकर,सल्लगार,  महाराष्ट्र राज्य गणेश वनकर अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य मिथुन हनुमंते अध्यक्ष, बल्लारपूर शहर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या