Ticker

6/recent/ticker-posts

आंबेडकरी समाजाचे निवेदन; नान्नज येथील साळवे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करा

आठ दिवसात कारवाई न झाल्यास जामखेड बंद ठेवणार - विकीभाऊ सदाफुले...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615

जामखेड :- नान्नज ता. जामखेड येथील आर.पी.आय.चे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या पत्नी, मुलगा, पुतण्या व कुटुंबीयांवर साबळे व त्यांच्या मित्रांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुनिल साळवे यांचा पुतण्या अभिजित संपत साळवे गंभीर जखमी असून त्याच्यावर ससून रुग्णालय, पुणे येथे उपचार सुरू आहेत. तर सुनिल साळवे यांची पत्नी व मुलगा यांना अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले आहे.
        यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले म्हणाले की,आरोपींना आठ दिवसांत अटक न झाल्यास आंबेडकरी समाज आक्रमक भूमिका घेऊन जामखेड शहर बंद ठेवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. समाजाला आक्रमक पवित्रा घ्यावा लागल्यास त्याचे सर्वस्वी परिणामास शासन जबाबदार राहील, असेही ते म्हणाले.
        सदर घटनेत गुन्हा दाखल असूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक झालेली नसल्याने ते मोकाट फिरत आहेत. यामुळे संतप्त आंबेडकरी समाजाने जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
         यावेळी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, भारतीय बौद्ध महासभेच्या सुरेखाताई सदाफुले, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, बाबासाहेब सोनवणे (युवक तालुकाध्यक्ष-आरपीआय),अनिल जावळे, साठे नगर अध्यक्ष किशोर कांबळे,अनिल सदाफुले,सचिन (जाॅकी) सदाफुले,सिध्दार्थ नगर अध्यक्ष अक्षय घायतडक, प्रतिक निकाळजे, लखन मोरे, काशिनाथ सदाफुले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या