Ticker

6/recent/ticker-posts

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे


सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894

पालघर : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यास शासनाकडून मंजुरी मिळालेली आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत लाभार्थी निवडीची प्रक्रिया महाडीबीटी या प्रणालीद्वारे राबविण्याचे निर्देशित आहे महाडीबीटी प्रणाली सुरु झाल्यापासून योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी मागील प्राप्त अर्ज आणि दि.30 नोव्हेंबर 2022 पर्यंत प्राप्त होणारे अर्ज यांची एकत्रीत लॉटरी महाडीबीटीद्वारे केली जाईल. 
या योजनेमध्ये पुढील लाभार्थ्यांना अर्ज करता येतील. या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल. संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांनाचा स्वत:च्या नावे 7/12 असणे आवश्यक आहे . यापूर्वी महाडीबीटीवर प्राप्त झालेल्या अर्जामधून सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला व दिव्यांग वक्ती यांची निवड केली जाईल. यास्तव जास्तीत जास्त शेतक-र्यांनी महाडीबीटी प्रणाली वर ऑनलाईन अर्ज करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दिलीप नेरकर यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या