रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा :-लांखादुर तालुक्यातील चिचाळ/बारव्हा येथिल श्री हरिदासन महिला महाविद्यालयात स्वातंत्र दिन कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला.
ध्वजारोहण श्रीमती कुंदाताई गणेशजी भुरले (माजी स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी) यांच्या हस्ते करण्यात आले, या प्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री एकनाथजी तासलवार, श्रीमती वासंतीबाई बगमारे,श्री खुशालजी गटारे, महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य श्री जितेश रहांगडाले, प्राध्यापक व , शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.
ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर श्री हरिदासन महिला महाविद्यालयातून शशिकांत दैठणकर ज्युनियर कॉलेज बारव्हा या दोन्ही कॉलेजची सामूहिक मिसणूक बारव्हा, जैतपुर तसेच खोलमारा या गावातून काढण्यात आली.
या मिरवणूकीला गावातील ग्रामस्थांना उत्स्फूर्त
असा प्रतिसाद दिला या कार्यक्रमा करिता सामूहिक मिरवणूकी करीता दोन्ही कॉलेजचे प्राचार्य श्री. प्रशांत सोनपिपडे सर तसेच श्री जितेश रहांगडाले सर यांनी मोलाचे असे सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. यशवंत भोरगे सर तसेच आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सुरेश राठोड सर यांनी केले शेवटी कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.
0 टिप्पण्या