Ticker

6/recent/ticker-posts

सुकणी येथे एकावर धारधार शस्ञाने हल्लाआरोपी अटकेत

चित्रा न्युज प्रतिनिधी 
हंडरगुळी :-येथून जवळच असलेल्या सुकणी या गावात एका इसमावर धारधार शस्ञ मारुन जख्मी केले असून सदरच्या गुन्ह्यातील आरोपीवर वाढवणा पो. ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंद करुन आरोपीला अटक केली.
याबाबत पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की,फिर्यादी सुभाष भागुराम सुकणे (वय ५० रा.सुकणी) हे पत्नी व २ मुलांसह स्वघरी बसले असता गावातील व भावकितीलच असलेला अंकुश रामराव पाटील रा. सुकणी हा फिर्यादीच्या घरा समोर येऊन माझा मुलगा तुमच्या घरामध्ये आला आहे का?अशी विचारणा केली असता फिर्यादीने तुमचा मुलगा माझ्या घरी आला नाही.असे म्हटले असता आरोपीने फिर्यादीसह त्यांचे कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करु लागल्याने शिविगाळ करु नका.असे म्हणताच आरोपीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पोटरीवर धारधार कोयत्याने वार केला.तसेच पत्नीला धकाबुकी करुन जीवे मारण्याची धमकी दिली.या जबर हल्ल्यात आठ टाके पडले आहेत.वगैरे फिर्याद दिले वरुन पो.स्टे.वाढवणा येथे आरोपी अंकुश पाटील याच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला असून याचा पुढील तपास वाढवणा पोलिस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या