Ticker

6/recent/ticker-posts

चिराग शहा अमृत सरोवर परिसरात मालतीबाई पैठणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण


• आ. मुटकुळे, जिल्हाधिकारी पापळकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515


हिंगोली  :  आजादी का अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सव आणि माझी माती माझा देश अभियानांतर्गत येथील चिराग शहा अमृत सरोवर परिसरात स्वातंत्र्य सैनिकांच्या पत्नी मालतीबाई भालचंद्र पैठणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 
 यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक पोर्णिमा गायकवाड, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, शिक्षणाधिकारी माधव सलगर, संदीपकुमार सोनटक्के, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार नवनाथ वगवाड, मुध्याधिकारी अरविंद मुंढे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रफुल खिराडे उपस्थित होते.
 याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या