चित्रा न्युज प्रतिनिधी
नंदुरबार :-नवापूर तालुक्यातील ढोरपाडा गावात शेतामध्ये अवैधरित्या जुगारचा अड्डावर पोलिसांनी कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 15 जुगाऱ्यांची धरपकड केली. शेतात अवैधरित्या जन्नामुन्ना नावाचा जुगार खेळला जात होता. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाने सापळा रचत कारवाई केली. यामध्ये 3 लाख 87 हजार रुपये रुपयांची रोकड, चारचाकी 5 वाहने, 10 मोबाईल, 15 आरोपी नवापूर, विसरवाडी, गुजरात राज्यातील सोनगड, उकई, व्यारा त्यांच्याविरुद्ध विसरवाडी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
0 टिप्पण्या