रुपाली मेश्राम कार्य.संपादिका मो.9552073515
भंडारा:भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय च्या जुन्या इमारतींचे उद्घाटन राज्याचे माजी मुख्यमंत्री मा बैरी.अब्दुल रहमान अंतुले यांच्या शुभ हस्ते, जिल्ह्याचे पालक मंत्री मा.हरिभाऊ नाईक यांचे उपस्थितीत ६ फेब्रुवारी १९८१ रोजी झाले होते.
जिल्ह्यातील गरीब रुग्णांसाठी हे हॉस्पिटल एकमात्र आशा चे स्थान दर दिवशी रुग्णांची संख्या सतत वाढत चालली आहे.रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा,योजना , औषधे ई च्या सोयी,सुविधा इथे उपलब्ध असून डिलिव्हरी चे ऑपरेशन रेकॉर्ड ऑपरेशन सुध्धा होत आहेत.परंतु नुकतेच ग्रीन हेरिटेज समिती ने केलेल्या निरीक्षणात इथे स्वच्छतेचे अभाव, घाणेरड्या नाल्या,संडास,बाथरूम चे चित्र निदर्शनास आले.खाली संडास,बाथरूम येथून वाहणारा संडास,मुतारी चा घाणेरडा पाणी ई मुळे रुग्णांना नाकावर कपडा ठेवून चालावे लागते. तुटलेल्या पाइपलाइन मधून खाली वाया जात असलेला पाणी,गल्लीत इतरत्र पडलेला कचरा,मरचुरी जवळ साठलेल्या घाणेरड्या पाण्यात जमलेले डास, मच्छर दृष्टीस पडले असता तिथे असलेल्या एका कर्मचारी ने इथे टाकण्याकरिता त्यांना औषध मिळत नसल्याचे सांगितले.४२ वर्ष जुनी या इमारतीस कुठे_कुठे तडे गेले असून जीर्ण प्लास्टर कधी ही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.इमारती चे खिडकी खाली कचरा अडकून पडला आहे.
मागील कोरोना काळात मागे नवीन इमारती बांधल्या गेल्या असून इथे ही काही विभाग आहेत.
इथे वाढत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत रिक्त पद तात्काळ भरणे गरजेचे असून, आरोग्य,स्वच्छता विषयक बाबींवर गंभीरतेने जिल्हा रुग्णालय प्रशासनाने पाऊल उचलण्याची गरज आहे.
0 टिप्पण्या