रुपाली मेश्राम कार्य.संपादिका मो.9552073515
चंद्रपूर :- दि. 17/10/2023 ला रात्री ठीक एक वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचे लुईस वाडी ठाणे येथील घरी पूर्व विदर्भाचे नेते श्री किरण भाऊ पांडव यांचे नेतृत्वात पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या संघटन बांधणी संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली . तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता यावे व कपाशीच्या व तूर पिकाला पाणी देता यावे व रब्बीच्या हंगामाकरिता ओलिताची व्यवस्था करता यावी, याकरिता एक महिन्याकरिता चंद्रपूर जिल्हा भार नियमन मुक्त करण्यात यावा. याचे निवेदन देण्यात आले. यावरती मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ होकार दर्शवून कारवाईचे आदेश दिले. याप्रसंगी चंद्रपूर जिल्ह्याचे नवनियुक्त संपर्कप्रमुख श्री गंगाधर जी बडूरे, श्री नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर, वर्धा जिल्हाप्रमुख श्री राजेश जी सराफ हे उपस्थित होते*.
0 टिप्पण्या