Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थिनीची भरदिवसा कोयत्याने गळा चिरून हत्या

 

चित्रा न्युज प्रतिनिधी
पालघर :- विद्यार्थिनीची भरदिवसा कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे घडली आहे. विद्यार्थिनी महाविद्यालयातून आश्रमशाळेकडे जात जात असताना रस्त्यात तिची हत्या करण्यात आली. अर्चना उदर असे या घटनेत मृत विद्यार्थिनीचे नाव असून या घटनेमुळे मोखाड्यात खळबळ उडाली आहे. पालघर जिल्हयातील मोखाड्यातील गभालपाडा येथील आश्रमशाळेत शिक्षण घेत होती. आश्रम शाळेत वर्ग खोल्या कमी असल्याने शेजारी असलेल्या महाविद्यालयात अकरावी बारावीचे वर्ग सुरू होते. शुक्रवारी नेहमीप्रमाणे अर्चना ही आश्रमशाळेतून महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर दुपारच्या वेळेसजेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून आलेल्या एका इसमाने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने गळा चिरून अर्चनाची हत्या केली. यावेळी अर्चनासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर मोखाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत जात असताना मागून आलेल्या एका इसमाने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने गळा चिरून अर्चनाची हत्या केली. यावेळी अर्चनासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरड सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मोखाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेनंतर मोखाडा पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. या घटनेनंतर आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या