Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर पिण्याच्या पाण्यासाठी महिला हंडा मोर्च

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया(आठवले) पक्षाचा दनका,दोन दिवसात दलित वस्तीमध्ये पाणी येणार.............

गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी औरंगाबाद मो.8308128457

औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील ७४जळगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मधील एकुण प्रभाग तीन असुन त्या प्रभागात रोज पाणी सोडले जात होते.पण प्रभाग तीन मधील दलित वस्तीमध्ये गेल्या दोन ते अडीच महिण्या पासुन ग्रुप ग्रामपंचायत पाणी सोडत नसल्यामुळे दलित वस्तीमधील नागरिकांनी व महिलांनी ग्रामपंचायतला निवेदन,विनंती अर्ज करुनही ग्रामपंचायत कुठलेही दखल घेत नसल्यामुळे कुठलेही कारण सांगुन दलित वस्तीमध्ये पाणी सोडण्यास टाळाटाळ करत होती.त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) पक्षाचे पैठण तालुका उपाध्यक्ष गौतम भाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रिपाई(आठवले) पक्षाच्या वतीने निवेदन देवुन दि.१७/१०/२०२३ वार मंगळवार रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयावर  पिण्याच्या पाण्यासाठी महिला हंडा मोर्चा काढण्यात आला.या महिला हंडा मोर्चाचे गांभीर्य घेवुन ग्रुप ग्रामपंचायतचे अधिकारी ग्रामसेवक श्री मापारी यांनी दोन दिवसात दलित वस्तीमध्ये पाणी सोडले जाईल अशी लेखी दिली.यावेळी हंडा मोर्चातील महिला लक्ष्मीबाई सोनवणे,येल्हनबाई जगधणे,सुमनबाई जगधणे,नंदाबाई जगधणे,सोनाबाई जगधणे,कमलबाई सोनवणे,सुलाबाई जगधणे,निर्मला सोनवणे,मिरा जगधणे,मिनाबाई जगधणे,वर्षा जगधणे,अनिता सोनवणे,इंदुबाई मोरे,ताराबाई जगधणे,शांताबाई गुडेकर,कमलबाई सदावर्ते,सविता जगधणे,शोभाबाई जगधणे,सुरेखा जगधणे,मनिषा जगधणे,रंजना जगधणे,निर्मला दळे,रंजना खरात,कविता जगधणे,स्वाती जगधणे,रंभाबाई शेळके,साळुबाई जगधणे,पुष्पाबाई बर्डे,विमलबाई लाटे,सोनाबाई जगधणे,छबाबाई पवार,झुंबरबाई चव्हाण,अरेफा शेख,यांच्यासह या हंडा मोर्चात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.या मोर्चात पुरुष मंडळी यांनीही हजरी लावली होती.रामदास जगधणे, राहुल सोनवणे,हिरामन जगधणे,अरुण सोनवणे,प्रकाश जगधणे,वसंत जगधणे,अर्जुन जगधणे,विक्रम बर्डे,नवनाथ गुढेकर,आदित्य जगधणे,कैलास जगधणे,यांनीही या मोर्चात हजरी लावली होती.याप्रसंगी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपणीय शाखेचे बणगे,सहाय्यक फौजदार सोमनाथ तांगडे,बनकर यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या