सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो.नं. 7058137098/9615179615
जामखेड:- नान्नज ता.जामखेड येथे 24 ऑगस्ट रोजी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर काही गावगुंडानी शस्त्रस प्राणघातक हल्ला करून कुटुंबातील सदस्यांना गंभीर जखमी केले होते त्यासंबंधी पोलीस स्टेशनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व अँट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे दि.26 ऑगस्ट रोजी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना निवेदन दिले होते 8 दिवसात आरोपी अटक करा अन्यथा जामखेड बंद ठेवू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी दिला होता.
परंतु 14 पैकी 6 आरोपींना अटक केली आहे अद्याप उर्वरित आरोपींवर अटकेची कारवाई झाली नाही,
एकतर्फी हल्ला होऊन देखील साळवे कुटुंबावरच गुन्हा दाखल करून अन्याय झाला आहे.
उर्वरित आरोपींना अटक करावे, साळवे कुटुंबावर झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा,साळवे कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे,आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी,मुख्य सूत्रधाराला अटक करावी,केस फास्टट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करावी यामागणी साठी समस्त आंबेडकरी समाज आक्रमक होऊन रविवारी 7 सप्टेंबर रोजी जामखेड बंदचे व खर्डा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.
जामखेड बंदमध्ये सर्व जामखेड शहरातील व्यापाऱ्यांनी सहभाग घेऊन सहकार्य करावे असे आव्हान समस्त भिमसैनिक जामखेड तालुका या सामाजिक संघटनेने केले आहे.
0 टिप्पण्या