रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा:- नुक्तेच स्वच्छता ही सेवा अंतर्गत १ आक्टो. रोजी जीथे तिथे जोरात स्वच्छता अभियान राबवुन श्रमदान द्वारे स्वच्छता कर न्यात्त आली.फोटो ही काढ़लेपण अभियान संपताच जशास तशी परिस्थिति निर्माण होवूंन पून्हा जागो_जागी तेच कचऱ्याचे ढीग कूठे कमी, तर कुठे जास्त प्रमाणात पहावयास मिळाले.
स्वच्छता अभियान पश्चात निरीक्षण दरम्यान भंडारा शहरातील मोठा बाजार (पोस्ट ऑफिस समोर) येथिल भाजी बाजार,शमशानघाट रस्ता, जील्हा हॉस्पिटल रस्ता,रानी लक्ष्मीबाई वार्ड, जे एम पटेल कॉलेज समोरिल बगीचा,हनुमान वार्ड, जे. के.शाळा रोड,हनुमान वॉर्ड(हॉस्पिटल रोड) ई ठिकाणी कचरा निदर्शनास आला.कचरा उचलला जातो पण अनेक वॉर्डातील लोक कचरा गाड़ी असुन् सुद्धधा खुल्या जागी कचरा टाकतात, तो कचरा गाई ई. प्राणी ही खातात.
मोठा बाजार येथे आजू_बाजूचे भाजी तथा फळं विक्रेते येथे कचरा फेकत असल्यामुळे इथे खूप घाणेरडे,अत्यंत दूषित वातावरण होवून भाजी विक्रेते, ग्राहकान्ना खुप त्रास होवुन नाकावर कपड़ा ठेवावे लागते.न. प. कडून कचरा उचल्ल्या नंतर पुन्हा त्याच ठिकाणी येथे कचरा टाकला जातो.नगर परिषद कडून अश्या लोकांवर करडी नजर ठेवून आढळल्यास नोटीस बजावून कारवाही केली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. शहर नेहमी सुंदर,स्वच्छ ठेवण्यासाठी न. प. तर्फे प्रत्येक वार्डातील नगर सेवक व नागरिकांची स्वच्छता निरीक्षण कमिटी स्थापन करून सतत निगराणी करने गरजेचे आहे.
या बाबत न. प.चे मा. मुख्य अधिकारी यांना ग्रीन हेरिटेज पर्यावरण संस्थे तर्फे पत्र ही देण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या