Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात 24 नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रेस प्रारंभ- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे


•  विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी होण्यासाठी योग्य नियोजन करावे


चित्रा न्युज प्रतिनिधी
परभणी: केंद्र शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने तिसऱ्या टप्प्यामध्ये परभणी जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या आयोजन करण्यात आले असून, 24 नोव्हेंबर रोजी यात्रेस प्रारंभ होणार आहे. याकरीता जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी योग्य नियोजन करत, हि विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने आज आयोजित बैठकीत श्री. गावडे बोलत होते. बैठकीस मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लखमवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संदीप घोन्सिकर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक उदय कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी किशोरसिंग परदेशी आदींची उपस्थित होती.

जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी म्हणाले की, केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने दि. 15 नोव्हेंबर, 2023 ते 26 जानेवारी, 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून, अद्यापपर्यंत ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येत आहे. या यात्रेसाठी शासनाकडून विविध कल्याणकारी योजनाची सविस्तर माहिती असलेले चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये केंद्र शासनाच्या विविध योजनांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी केली जाणार आहे. या यात्रेसाठी परभणी जिल्ह्याची तिसऱ्या टप्प्यामध्ये निवड झाली असून, शुक्रवार, दि. 24 नोव्हेंबर, 2023 रोजी केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून यात्रेची सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्र आणि ग्राम पंचायत क्षेत्रामध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा महानगरपालिका/नगरपालिका क्षेत्र आणि विविध ग्रामपंचायत क्षेत्रात जाणार असल्याने प्रत्येक तालूकास्तरावर समन्वय समिती गठीत करण्यात यावी. तसेच  समन्वय अधिकाऱ्याची देखील  नियुक्त  करण्यात यावी. तसेच तालूकास्तरीय समन्वय समितीने या यात्रेचे दैनंदिन वेळापत्रक तयार करुन योग्य नियोजन करावे. भारत शासनाच्या फ्लॅगशिप योजनांचे या यात्रेत लाभ लक्ष्यित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व संबंधीत यंत्रणानी योग्य कार्यवाही करावी. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यात्रेसाठी मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, जाण्या-येण्याची व्यवस्था, स्थळ, यात्रेची माहिती, फोटो व्हिडीओ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, लाभार्थी, व्यापक जनसहभाग व जिल्हा समन्वयक यांच्या सहकार्याने ही मोहिम यशस्वी करण्यात यावी अशा सूचना ही यावेळी जिल्हाधिकारी श्री. गावडे यांनी दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या