रुपाली मेश्राम कार्य.संपादिका मो.9552073515
भोपाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संविधानाचे पुजक आहेत, संविधानाचे रक्षक आहेत, संविधानाला नतमस्तक होऊन ते देशाचा कारभार चांगला चालवित आहेत.त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे कधीही संविधान बदलु शकत नाहीत.महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला दिलेले संविधान जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहेत. ते परिपूर्ण आहे त्यामुळे भारतीय संविधान कधीही कोणतीही शक्ती बदलु शकत नाहीत.त्यामुळे मोदी संविधान बदलतील असा खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेस करित असलेल्या प्रचारावर विश्वास ठेऊ नका. असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी आज भोपाळ येथे केले.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकित भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांची भोपाळ मधील आंबेडकरनगर, पंचशीलनगर,प्रियदर्शीनी नगर.कोनार या आंबेडकरी बौध्द वसाहतींमध्ये पदयात्रा आणि जाहिर सभांना ना.रामदास आठवले यांनी संबोधित केले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे मध्यप्रदेश प्रमुख प्रभारी ऐहसान खान; राजेश खडसे आदि मान्यवर उपस्थित होते.
काँग्रेस हे संविधानाच्या मुद्यावर जाणीवपुर्वक आंबेडकरी जनेतीची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करित आहेत.भारतीय संविधान हे परिपूर्ण आहे ते बदलण्यासारखे नाही. जगातली कोणतीही शक्ती डॉ.बाबासाहेबांनी दिलेले भारताचे संविधान बदलु शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संविधानच्या गौरवासाठी संसदेचे स्वतंत्र अधिवेशन घेतले होते तसेच देशात 26 नोव्हेंबर हा संविधान गौरवदिन म्हणुन सरकार तर्फे साजरा करण्याची परंपरा नरेंद्र मोदी यांनी सुरू केली आहे.त्यामुळे नरेंद्र मोदी हे संविधानपुजक आहेत असे ना.रामदास आठवले म्हणाले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महु येथील जन्मभुमिस्मारक,दिल्ली येथील 26 अलिपूर रोड येथील निर्वाणभुमि स्मारक,मुंबईतील चैत्यभूमि स्मारक,नागपुरची दिक्षाभुमि,लंडन मधील स्मारक या पंचतिर्थस्थळांचा मोदी सरकारने विकास केला.देशात बौध्द स्थळांना जोडणाऱ्या बुध्दीस्ट सर्कल योजना ही नितीन गडकरी यांनी रस्ते मार्ग मंत्रालया द्वारे सुरु केली.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास होत आहे.मध्यप्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहाण हे चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले असून यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेशचा विकास होत आहे.आंबेडकरी जनतेने काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केला.
0 टिप्पण्या