Ticker

6/recent/ticker-posts

शेतात ठेवलेले धानाचे पोते चोरले

सावरी येथील घटना

धान उत्पादकाचे २० हजाराचे नुकसान

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- नजीकच्या  सावरी/ मुरमाडी येथे शेतात ठेवलेले १० धानाचे पोते अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना बुधवारी (ता. २२) ला दुपारी ३ वाजता दरम्यान उघडकीस आली. यात चोरट्यांनी ८०किलो वजनाचे १०धानाचे पोते किंमत २० हजार चा मुद्देमाल चोरून नेल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे योगेश प्रभाकर धांडे असे नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेचा पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
         योगेश धांडे यांचे सावरी/ मुरमाडी शिवारात ३ एकर शेत असून शेतात हायब्रीड धानाची लागवड केली होती मळणीनंतर शेतातच ४४ पोते धान ठेवले होते. बुधवारी (ता. 22 ) ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतकरी योगेश धांडे यांनी पाहणी केली असता ४४ पोत्यांपैकी १० पोते धान रिकामी आढळले. शेतकऱ्याचे सुमारे ८ क्विंटल धानाचे नुकसान झाले आहे. सध्या परिस्थितीत धान खरेदी केंद्र सुरू व्हायची असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल तिथे धान साठवून ठेवले आहेत. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध अप क्रमांक ३९०/२०२३ कलम ३७९ भादवि नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस नायक श्रीकांत वाघाये अधिक तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या