Ticker

6/recent/ticker-posts

युवा महोत्सव, आयोजनासाठी पूर्व तयारी आढावा बैठक संपन्न


चित्रा न्युज प्रतिनिधी
पालघर  : युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. राज्यात सन २०२३-२४ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व कृषि आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. याविषयीची पूर्वतयारी आढाव बैठक निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली 

यावेळी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा क्रिडा अधिकारी सुहास व्हनमाने, तालुका क्रीडा अधिकारी भक्ती आंबरे, आदि उपस्थित होते.
 युवा महोत्सवाचे आयोजन जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर करुन राज्याचा प्रातिनिधिक चमु राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पाठविण्यात येतो. केंद्र शासनाने राष्ट्रीय युवा महोत्सव २०२३-२४ आयोजना बाबत दि. २३ व २४ एप्रिल २०२३ रोजी इंफाळ व दि.२२.९.२०२३ रोजी नवी दिल्ली येथे बैठकांचे आयोजन करण्यात आलेले होते, यामध्ये केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशा नुसार राज्यात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
  संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष  घोषित केलेले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी ". तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर २. सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान "ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सवात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या