Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्र उभारणीसाठी युवकांची भूमिका महत्वपूर्ण -डाॅ मोहम्मद गौस.


लिंगोजी कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो  9689821132
                                          
हिमायतनगर -: किनवट येथील बळीराम पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट चे वार्षिक विशेष युवक शिबीर मौजे चिखली खु येथे युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास शिबीर सुरु आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मौजे चिखली (खु.)चे मुख्याध्यापक विजय कुमार हे होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉ मोहम्मद गौस हे होते ते बोलतांना म्हनाले राष्ट्र उभारणीसाठी युवकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. म्हणून युवक हा निरोगी व सक्षम राहावं यासाठी किशोर वयीन मुलीच्या आरोग्यची तपासणी शिबीर व आरोग्य विषयक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.प्रसंगी डॉ.मोहम्मद गौस यांनी विद्यार्थ्यांना पोटाचे विकार, रक्तातील साखरेचे प्रमाण, कुपोषण, कर्करोग,एड्स, मानसिक आरोग्य, याविषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.डाॅ.एस.जी.मेंढेकर व व्ही.यु.धुतमल यांनी रक्त तपासणी केली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शेषराव माने यांनी केले.तर सूत्र संचालन प्रा.पुरूषोत्तम यरडलावार यांनी केले.उपस्थितांचे आभार प्रा.सुलोचना जाधव यांनी मानले.प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे निखिल खराटे, बजरंग जेपूरकार, श्रवण कोरडे, ओंकार लखुळे,दत्ता असलकर, रवी हट्टे अभय जाधव गंगा सरदार, जान्हवी श्राफ,शेख असबा,शेख फिरदौस अंजली कवडे.इ.स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या