प्रतिनिधी चित्रा न्युज
छत्रपती संभाजीनगर:-१०७- औरंगाबाद (मध्य) विधानसभा मतदारसंघाच्या स्वीप कक्षातर्फे आज ‘गुढी पाडवा मतदान वाढवा’, हा कार्यक्रम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या सभामंडपात घेण्यात आला. यानिमित्ताने पथनाट्य व रांगोळीच्या माध्यमातून जनजागृतीपर आवाहन करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तर प्रमुख अतिथी म्हणून तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे, रुपाली मोगरकर, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. एक.एम. जिंतूरकर, शासकीय औषध निर्माण महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. प्रशांत शामकुंवर, उपसंचालक अजित शिंदे, विवेकानंद महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र शेजूळ यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. राजेंद्र शेजूळ यांनी मतदान प्रक्रियेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मतदान करुन देशाची लोकशाही बळकट करुन आपण आपला विकास साधू शकतो असे आवाहन आवाहन तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. व्यंकट राठोड यांनी नव मतदारांनी मतदानाच्या दिवशी सुट्टीचा आनंद न घेता एक दिवस आपल्या देशासाठी द्यावा. तसेच ज्या तरुण - तरुणी मतदार नाहीत त्यांनी आपले आईवडील, नातेवाईक व मित्र मंडळ यांच्याकडे "तुम्ही मतदान करा" असा हट्ट धरा व त्यांना मतदानाला पाठवा असे आवाहन केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा दिली.
अमर सोनवणे विनायक साळुंके, राकेश वाणी, औदूंबर वानखेडे यांच्या पथकाने पथनाट्यातून सर्वांना हसवत 'मतदान कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करा', यावेळी राहुल दाभाडे यांच्या डोलकिच्या आवाजाने मंत्रमुग्ध केले.
कलाशिक्षक राजेंद्र वाळके यांनी प्रवेशव्दारावर ‘गुढीपाडवा... मतदान वाढवा’, या संकल्पनेवर लक्षवेधी, सुरेख अशी रांगोळी रेखाटली होती. प्रत्येकाने रांगोळीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सूत्रसंचालन राम वाव्हळ यांनी तर आभारप्रदर्शन नोडल अधिकारी उमेश दौंड यांनी केले.स्वीप कक्षाचे रामेश्वर मोहिते, रवी काळे, राजेंद्र वाळके, राजेंद्र माने,भरत वाघ, अनिल जाधव यांची उपस्थिती होती.
०००००
0 टिप्पण्या