• ६८ ग्रामपंचायतमध्ये १७९ अकुशल कामे सुरू
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- सध्या नवतपा सुरू असल्यामुळें पारा ४३ अंशावर गेलेला आहे. सूर्य आग ओकू लागल्यामुळे जबरजस्त उष्णतेची लाट सुरू आहे. रोहिणी नक्षत्रात सुरुवात झाल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे सोडून गरीब व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मजूर वर्ग महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ५० टक्के ग्रामपंचायत स्तराचे मजूर प्रधान कामावर उपस्थित असल्याचे वास्तव समोर आले आहे. आजघडिस शनिवार(१ जून) रोजी ६८ ग्रामपंचायतीत १७९ अकुशल कामे सुरू आहेत. ग्रामपंचायतीने ग्रामीण परिसरात २४ हजार ७७० मजूरांना रोजगार उपलब्ध केला आहे.
ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबातील एका व्यक्तीस वर्षातून १०० दिवस रोजगार उपलब्ध करण्याचे उदात्त हेतूने केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेस सुरुवात केली. ती राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना या नावाने सुरू आहे. या योजनेचा केंद्रबिंदू ग्रामीण परिसर असून यात ६०% अकुशल(मजूर प्रधान) आणि ४०% कुशल कामांचे(बांधकाम) प्रयोजन करण्यात आले आहे. या योजनेचे नियोजन, सनियंत्रण व देखरेखीचे काम ग्रामपंचायतीकडे सोपविण्यात आले असून याकरिता ग्रामसेवकाला सहाय्यक म्हणून रोजगार सेवकाची निवड करण्यात आली आहे.
लाखनी तालुक्यात १ नगर पंचायत आणि ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून ९४ लोक वस्तीची तर १० गावे रीठी आहेत. लोकसंख्या १ लाख २८ हजार ५४५ आहे. कुटुंब संख्या २५ हजार ४९९ , मजूर संख्या ४९ हजार ५३१ तर दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची संख्या १७ हजार १४० आहे. चालू खरीप हंगामात सरासरी पेक्षा कमी पर्जन्यवृष्टी त्यानंतर धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झाले असल्यामुळे तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती होती. खरीप हंगाम संपल्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमीची कामे अपेक्षाप्रमाणे पंचायत समिती प्रशासनाने ५० टक्के ग्रामपंचायत स्तरावरील मजूर प्रधान कामे(अकुशल) सुरू करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला केल्याने अनेक गावात कामांना सुरुवात करण्यात आली.
त्यात सिंचन विहीर ११, घरकुल ६३, भातखचरे २६, मिश्र रोपवन २, वृक्षारोपण 4, याशिवाय मामा तलाव मजुरप्रधान कामे गडेगाव, देवरी २, वाकल, मोरगाव, खुणारी, खराशी, आलेसुर, किटाडी, रेंगेपार/कोहळी, मुरमाडी/तूप, धाबेटकडी, सालेभाटा, पिंपळगाव, गोंडसावरी, गोंदी, कवलेवाडा, मांगली, रामपुरी, निमगाव, झरप, गराडा, परसोडी, डोंगरगाव/न्या २, इत्यादी गावात मामा तलाव खोलीकरण तसेच सिपेवाडा, कन्हाळगाव, जेवनाळा, मोगरा, पळसगाव, निलागोंदी २, धानला, गुरढा, गोंडेगाव, सामेवाडा, विहिरगाव, चांन्ना, खैरी,पिंपळगाव, कवलेवाडा, पोहरा2, मुरमाडी/सा., सेलोटी, पेंढरी, लाखोरी, गराडा, इत्यादी बंधारा गाळ काढणे व शिवणी, मानेगाव, सिपेवाडा, कीन्ही, मासलमेंटा, शिंदीपार, मर्हेगाव, इसापूर, लोहारा 2, पळसगव, सोनमाळा, गुरढा, खेडेपार, सोमलवाडा, कोलारी इत्यादी गावात नाला सरळीकरण कामे सुरू असून सर्व कामावर २४ हजार ७७० मजूर कार्यरत आहेत. ही मजूर प्रधान कामे सुरू करण्याकरिता गटविकास अधिकारी नेताजी धारगावे, विस्तार अधिकारी(पंचायत) प्रमोद हूमने, लांजेवार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गिऱ्हेपुंजे, कार्यक्रम व्यवस्थापक महेंद्र साखरे, तांत्रिक सहाय्यक महेश बर्वे, यशवंत शेंडे, विनाश वालोदे, गिरिधर मेश्राम, आनंद वाघाये, अमरदिप शेंडे, राकेश दाते, सुधाकर कांबळे, किरण बावनकुळे, रजनी नांदगावे इत्यादी परिश्रम घेत असून संगणक परिचालक हितेश झलके, रामेंद्र लाडे, गणेश(बाळू) टीचकुले, अस्मिता कावळे यांचेसह रोजगार सेवक, सरपंच, ग्रामपंचायत कमिटी सहकार्य करीत आहेत.
0 टिप्पण्या