सालेभाटा शेतशिवारातील घटना
पोलिसात गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:-लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे २ शेतात लावलेले सबमार्सिबल मोटारपंप सह मोटारपंपाला लावलेले साहित्य अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना गुरुवार(ता.३०) दुपारी ४:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. यात दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २२ हजार ७०० रुपयाचे साहित्य चोरून नेल्याने शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात तपास सुरु आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतात बारमाही संचानाची सोय होऊन दुबार तीबार पिके घेता यावी. तथा जीवनमान उंचावावे. या करिता शेतकरी शेतात बोअरवेल(कूपनलिका) खोदून त्यात मोटार पंप लावून आपल्या शेतात सिंचनाची सोय करतात. याच प्रकारे आकाश खेडकर व मनीष बघेले यांचे लागून शेत असून शेतात कुपनलिका(बोअरवेल) खोदून त्यात १० हजार ५०० रुपये किमतीची सीआरआय४एफएमएस -१४/१० सबमर्सिबल मोटारपंप, एचडीपीई पाईप ४५ मीटर लांबीचे किमत २ हजार, सी आर आय केबल ५२ मीटर किमत २ हजार व नायलॉन रस्सा १७० फुट किंमत १२०० असा एकूण १५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल तसेच मनीष बघेले यांच्या शेतातील ७ हजार किमतीची सबमर्सिबल मोटार पंप चोरून नेल्याची घटना गुरुवारी(ता.३०) दुपारी ४:०० वाजता दरम्यान उघडकीस आली. यात दोन्ही शेतकऱ्यांचे सुमारे २२ हजार ७०० रुपयाचे नुकसान झाले आहे. आकाश खेडकर यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २०२/२०२४ कलम ३७९ भादवि नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस हवालदार योगिता सिंगनजुडे तपास करीत आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 टिप्पण्या