Ticker

6/recent/ticker-posts

टाउन पोलीस चौकी फक्त नावालाच का साहेब ?

अवैध धंद्याचे माहेर घर रामटेक तहसिल !

सचिन चौरसिया चित्रा न्युज 
रामटेक:- रामटेक मध्ये गांधी चौक परीसरात टाउन पोलीस चौकी बांधण्यात आली असुन ती चौकी फक्त नावालाचं आहे काय ? असा प्रश्न नागरीकांना पडलेला आहे. रामटेक गांधी चौक परिसरातली टाउन पोलीस चौकी नावालाच असून, काम मात्र ० असल्याचे दिसत आहे. त्यामुळं रामटेक  तालुक्यातील गावातील परिसरात सट्टा-पट्टीचा व दारुचा व्यवसायाचा सरास सुरु असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. अवैध व्यवसायीकांनी अक्षरशः कहर केला असून, सर्रास पणे अवैध धंदे चालू असल्याने, आपली सट्टा पट्टीची दुकाने जोमात थाटली आहेत. टाउन पोलीस चौकी जवळील बाजार चौकात व्यवसाय चालू आहे. तर फुटपात च्या बाजुला आपली दुकाने थाटली आहेत. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.
रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक ठिकाणी अवैध धंदे खुले आम चालू असल्याने, रामटेक पोलीस कुठे बिजी आहेत का अशी चर्चा जोरदार चालू आहे. रामटेक पोलिसांचे काम संशयास्पद असून, बेकायदेशीर धंदेवाल्यावर ना कोणाचा धाक आहे ना दरारा. तर कोण पोलीस आमचे काही करू शकत नाही, आमी पोलीसांना महिन्याला हप्ते देतो, असे म्हणण्यापर्यंत त्यांनी आता मजल मारली आहे. ह्या लोकांना तालुक्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना जवळ करून, पोलीसांच्या मदतीने व्यवसाय थाटला आहे की काय? असा सवाल येथील नागरिक करीत आहे.
हे असे असेल तर पोलीस प्रशासनाने मात्र वेळीच यांना लगाम न घातल्यास, याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात जनतेला आणि पोलिस प्रशासन यांना सहन करावे लागणार हे मात्र निश्चित. पोलीसांकडून या धंदेवाल्यांवर कारवाई करण्याऐवजी महिन्याला हप्ते वसुली केली जाते. अशी नागरीकामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. 
रामटेक गांधी चौक परीसरातील टाउन पोलीस चौकी काय हप्ते गोळा करण्यासाठी आहेत का? असा सवाल नागरिक करत आहेत. हा बेकायदेशीर सट्टा-पट्टी, दारु अवैधधंदे या भागात मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या भागातील पोलिस अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले असून, त्यांचा या भागात कसल्याच प्रकारचा धाक नसल्याने अवैध धंदेवाल्यांनी आपले धंदे बेकायदेशीरपणे चालू ठेवले असल्याचे बोलले जात आहे. रामटेक मधील गांधी चौक चौकीने सट्टा-पट्टी, दारू, जुगार असे व्यवसाय करणाऱ्या कीती लोकांवर २०२३ ला गुन्हे दाखल केले. रामटेक तहसिल मधील पोलीस चौकीपासुन ५ किमी अंतरावर आसलेल्या गावामध्ये अवैद्य धंदाचा विळखात सट्टा-पट्टी, दारू, जुगार असे आनेक धंदे चालू आहेत. सरास हाॅटेलवरती विना परवाना दारू विकली जाते. तरी देखील पोलीस हे पाहुन सुद्धा न पाहिले सारखे करत असतात, कुठे रेड होनार आसेल तर ते आधीच कळवतात? रामटेक परीसरातील कीती अवैद्य धंदे वाले यांचावर कारवाई केली पी. आय .साहेब तुम्हीच सांगा.! अशी नागरीकान मध्ये जोरदार चर्चा चालू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या