या निमित्ताने राबविले स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रम
कार्यक्रमास गुरुकुल आयटीआय व ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे सहकार्य
संजीव भांबोरे भंडारा
भंडारा:-लाखनी येथील मुख्य बसस्थानकावर
ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने तयार केलेल्या 'नेचर पार्क'वर सकाळ व सायंकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी- कर्मचारी यांनी मानव सेवा मंडळाची स्थापना दोन वर्षांपूर्वी गुरुकुल आयटीआय तसेच ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब यांच्या सहकार्याने केली.त्या मानव सेवा मंडळाचा दुसरा वर्धापन दिन विविध उपक्रम घेत साजरा करण्यात आला. विशेषतः नेचर पार्कवर स्वच्छता अभियान राबवून सर्वत्र विखुरलेले प्लॅस्टिक केरकचरा गोळा करण्यात आले. तहानलेल्या पक्षी प्राण्यासाठी ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब व गुरुकुल आयटीआयने तयार केलेले जलकुंड स्वच्छ करण्यात आले.यानंतर मानव सेवा मंडळाच्या दुसऱ्या वर्धापन दिन निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला.
सायंकाळी गुरूकुल आयटीआय इथे झालेल्या वर्धापन दिन कार्यक्रनाच्या अध्यक्षस्थानी ऍड. शफी लद्धानी हे तर प्रमुख अतिथी सुभेदार ऋषि वंजारी,गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम, ज्येष्ठ नागरिक भैय्याजी बावनकुळे, भीमराव गभने,शिवलाल निखाडे,दिलीप निर्वाण,टोलीराम सार्वे हे होते.ज्येष्ठ नागरिक भैय्याजी बावनकुळे यांनी आपल्या अतिशय सुंदर व प्रभावी अशा मनोगतातून आयुष्याची संध्याकाळ मानव सेवा मंडळामुळे अधिक रमणीय झाली असे प्रतिपादन केले. सोबतच मानव सेवा मंडळाच्या विविध उपक्रम जसे पाच माणुसकीच्या भिंती,निराधार गरजूंना हिवाळ्यात ब्लॅंकेट वाटप,विविध निसर्गरम्य ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सहलींचे आयोजन,वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,दररोज सकाळी नेचर पार्कवर घेत असलेले योगा, व्यायाम व संगीत तसेच नृत्य व्यायाम ,मानव सेवा मंडळाच्या सदस्यांच्या सर्व तिन्ही पिढ्याच्या कौटुंबिक सदस्यांना दिल्या जात असलेल्या वाढदिवस व लग्न वाढदिवस शुभेच्छा ,नास्ता तसेच जेवण कार्यक्रम अशा विविध उपक्रमाने सर्व मानव सेवी ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य अधिक सुखमय व रमणीय झाले आहे अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.ऍड. शफी लद्धानी यांनी अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना सर्व मानव सेवी सदस्यांनी एकजुटीने, एकदिलाने कोणतेही मतभेद व मनभेद न ठेवता आणखी जोमाने कार्य करू या असे प्रतिपादन व्यक्त केले व मानव सेवा मंडळाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन भविष्यात याहून अधिक चांगले उपक्रम राबवू यावेत अशी मार्गदर्शक सूचना सुद्धा त्यांनी केली.
यानंतर व्दितीय वर्धापनदिनाचा केक सुभेदार ऋषी वंजारी, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेश्राम, ऍड. शफी लद्धानी,ज्येष्ठ नागरिक भीमराव गभने,शिवलाल निखाडे,दिलीप निर्वाण,सुनील खेडीकर,डॉ. दिलीप अंबादे,टोलीराम सार्वे यांचे हस्ते कापून सर्वांना वाटप करण्यात आला.याप्रसंगी सर्वांकडून स्वादिष्ट रुचकर असा स्वरूची भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन सुभाष बावनकुळे तर आभार प्रदर्शन शिवलाल निखाडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता लाखनी नगरपंचायत नगरसेवक संदीप भांडारकर,सुभेदार ऋषी वंजारी, गुरुकुल आयटीआय प्राचार्य खुशालचंद्र मेशराम, शिवलाल निखाडे,दिलीप निर्वाण,सुभाष बावनकुळे,माणिक निखाडे, सुनील खेडीकर,टोलीराम सार्वे,ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबचे अशोक वैद्य, अशोक नंदेश्वर, प्रा.अशोक गायधने,लाखनी नगरपंचायत माझी वसुंधरा 4.0 अभियान पर्यावरण व स्वच्छता विभागाचे लीना कळंबे,ज्येष्ठ नागरिक मारोतराव कावळे,मंगल खांडेकर,सेवानिवृत्त महसूल निरीक्षक गोपाल बोरकर,कापड व्यावसायिक रमेश गभने,से. नि.प्राचार्य अशोक हलमारे,मानव सेवा मंडळ सदस्य पुरुषोत्तम मटाले,रतिराम गायधने, मधुकर गायधनी, रामकृष्ण गिर्हेपुंजे,ताराचंद गिर्हेपुंजे,चांगदेव वंजारी, से.नि. नायब तहसिलदार भीमराव कांबळे, वसंत मेश्राम,भैय्याजी बावनकुळे, विद्यमान जाधव,डॉ. दिलीप अंबादे,डॉ. पंढरीनाथ इलमकर, नरेश इलमकर, संदीप मेश्राम, अशोक धरमसारे,दुलीचंद बोरकर,अशोक चेटूले,योगराज डोर्लीकर, धनंजय तिरपुडे,शिंदे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या