संघदीप मेश्राम चित्रा न्युज
गोंदिया: शहरातील गणेशनगर आणि कुडवा येथे ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वसतिगृहाकरिता इमारती सज्ज आहेत. परंतु अद्याप फर्निचर मिळाले नसल्याने नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असतानाही वसतिगृह सुरू होण्याचा मुहुर्त निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ओबीसी संघटनांनी सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे अर्थमंत्री पद हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असून अर्थमंत्रालय ओबीसी वसतिगृहाला लागणार्या साहित्यासह नवीन इमारतबांधकामास निधी देण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच साहित्यविना ओबीसींचे राज्यातील ५५ वसतिगृह वाट बघत आहेते अशी टिका ओबीसी संघटनांनी केली आहे. एकीकडे मराठा जातीला सरकार पायघड्या घालून वाटेल त्या मागण्या मान्य करीत असून ओबिसीवर मात्र अन्याय करीत आहे. सरकार बाबत ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे.
0 टिप्पण्या