Ticker

6/recent/ticker-posts

चप्राड येथे उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- मालकीचे शेतात उन्हाळी धान कापणीचे काम करीत असतांना नवतपात अचानक झालेल्या तापमान वाढीसह तप्त हवेमुळे पुन्हा एक शेतकऱ्याचा बळी गेल्याची घटना उघडकीस आली असून मृतक शेतकऱ्याचे नाव भाष्कर पंढरी भुते(४०) रा. चप्राड/सोनी, तालुका लाखांदुर असे आहे.
                  भास्कर भुते हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी उन्हाळी हंगामात धान पिकाची लागवड केली होती. धान परिपक्व झाल्यामुळे ते पत्नीसह मालकीचे शेतावर धान कापणी करिता गेले असता दुपारचे सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने झाडाखाली बसले होते. सायंकाळी ४:३० वाजता चे सुमारास त्यांची प्रकृती खालावत असल्याचे पत्नीचे निदर्शनास आल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे भरती करण्यात आले. प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे कर्तव्यावरील वैद्यकिय अधिकाऱ्याने प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे जाण्याचा सल्ला दिल्याने नातेवाईकांनी सायंकाळी ७:०० वाजताच्या सुमारास भंडारा येथे नेत असताना वाटेतच भास्कर भुते यांचा मृत्यू झाला. या बाबद गावात माहिती होताच शोकमय वातावरण निर्माण झाले. त्यांचे मृत्यू पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी तथा बराच आप्त परिवार आहे. मन मिळावू भास्कर च्या अकाली निधनामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या