कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा:- जिल्ह्यात दिव्यांग, वृद्ध व निराधारांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे रुग्णसेवेला जीवन वाहिलेले सामाजिक कार्यकर्ता जयेंद्र देशपांडे यांनी बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रक्तपेढीत गुरुवारी(ता.२३) रोजी रक्तदान केले. हे त्यांचे २५वे रक्तदान आहे. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
सर्वसामान्य जनता व रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र मेहनत घेणारे जयेंद्र देशपांडे यांनी २०१३ पासून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. त्यांनी दर ३ महिन्यांनी रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचविले आहे. दिव्यांग, निराधार, वृद्ध या सारख्यांची ते निस्वार्थ सेवा करतात. त्यांच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभागामुळे ते युवक वर्गात लोकप्रिय आहेत. त्यांनी आता पर्यंत २५ वेळा रक्तदान केले असून त्यांचा अनेक सामाजिक व सांस्कृतिक संघटनांशी जवळचा संबंध असून ते बुद्ध विहार समन्वय समिती जिल्हा शाखा भंडारा चे महासचिव, केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली शाखा भंडारा चे सदस्य, प्रहार संघटनेचे जिल्हा महासचिव म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी बुद्ध पौर्णिमेचे दिवशी रक्तदान करून सामजिकतेचा परिचय दिल्याने सेवानिवृत्त उपायुक्त डॉ. रतनकुमार गेडाम, डॉ. प्रशांत बडोले, डॉ. देवानंद नंदागवळी, प्रा. शेखर बोरकर, सिद्धार्थ गजभिये, देवानंद कोकोडे, लोकेश गोटेफोडे, अश्विनी भिवगडे, अभय बडोले, पत्रकार नरेंद्र मेश्राम यांनी सामाजिक कार्यकर्ता जयेंद्र देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या