सोनू संजीव क्षेत्रे चित्रा न्युज
पालघर - राज्यात यंदा मान्सूनपूर्व पावसाने जोरदार बॅटिंग केली. नंतर पावसाने दडी मारली. काळे ढग रोज आकाश व्यापून टाकतात. पण पाऊस काही पडत नाही, अशी आवस्था आहे. आता काही जिल्ह्यात मान्सूनने पुन्हा एकदा दमदार सुरुवात केली आहे. राज्यातील अनेक शहरात तुफान पाऊस सुरु आहे. पालघरमध्ये तर पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे देहर्जे नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
पूल पाण्याखाली, वाहतूक ठप्प
हा पूल पाण्याखाली गेल्याने पालघर आणि मनोर वाडा यांच्यामधील संपर्क तुटला आहे. दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प पडली आहे. तर पश्चिम बोईसर-उमरोली स्टेशनदरम्यान रेल्वे ट्रकच्या अप आणि डाऊन दोन्ही लाईनमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे ट्रेन संथगतीने जात आहे. त्यामुळे रेल्वे 25-30 मिनिट उशीराने धावत आहेत.
0 टिप्पण्या