रुपाली डोंगरे चित्रा न्युज
पालघर : नेसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपया शेतकरी हिस्सा भरून सर्व समावेशक पिक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
. पालघर जिल्ह्यात भात नाचणी व उडीद ही पिके योजनेअंतर्गत अधिसूचित आहेत. भात, नाचणी व उडीद पिकासाठी निर्धारित केलेल्या पिक विमा हप्त्याच्या शेतकरी हिस्स्याच्या अनुक्रमे रक्कम रुपये 1035.30/-, 400/- व 500. पैकी रक्कम रुपये फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांस या विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. उर्वरित शेतकरी हिस्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 15 जुलै पर्यन्त अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याने आपला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज घेऊन हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी. सी.एस. सी केंद्र आपले सरकार पोर्टलच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी होऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरीता तात्काळ नजीकच्या तालुका कृषि अधिकारी, कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी कार्तिक नागरे (मो क्र 748050651) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, निलेश भागेश्वर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या