पंकज पाटील चित्रा न्युज
जळगाव :- अमळनेर तालुक्यातील सेन्ट मेरी इंग्लीश मेडिअम स्कुलची विद्यार्थीनी कु. आराध्या मुकेश पाटील हिने (इ. ५ वी) पूर्व उच्च प्राथामिक स्कॉलरशिप परीक्षेत अमळनेर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला असून तिचे सर्व स्तरांवर कौतुक व अभिनंदन होत आहे. आराध्या ही साने गुरूजी हायस्कुलचे शिक्षक श्री. मुकेश अमृत पाटील सर व सौ. स्नेहल मुकेश पाटील मॅडम यांची मुलगी आहे . अ. शि. प्र. मंडळाचे संचालक श्री अमृत बाजीराव पाटील (जानवेकर) यांची नात आहे. तिच्या यशाबद्दल आई - वडील आजी आजोबा, सेन्ट मेरी शाळेच्या प्रिन्सिपल व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, साने गुरुजी विद्यालयाचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर वृंद तसेच दुनियादारी गृप जी. एम सोनार नगर, मुंदडा नगर अमळनेर, जानवेकर परिवार, हिंदी अध्यापक मंडळ अमळनेर यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या