कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- इंजि. रुपचंद रामटेके हे लोकसेवक असतांनाही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ने त्यांचे कार्याची दखल घेऊन शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ ने नुकतेच सन्मानित करण्यात आल्याचे जिल्ह्यात माहिती होताच इंजि. रुपचंद रामटेके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
संजीवनी फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येते. बुधवार(ता.२१ ऑगस्ट) रोजी सिन्नर, जिल्हा नाशिक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री राईबाई पोपेटे, खासदार भाऊसाहेब वाखचौरे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तूपकर, आमदार माणिक कोकाटे, सामाजिक कार्यकर्ता रविराम गायकवाड, उदय सांगळे, रोहीदास वाघचौरे, संजीवनी फाऊंडेशन चे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर सानप यांचे प्रमुख उपस्थितीत इंजि. रुपचंद रामटेके भंडारा यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव २०२४ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या आधीही इंजि. रुपचंद रामटेके यांना अण्णाभाऊ साठे सामाजिक पुरस्कार, समाजकल्याण विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजसेवक पुरस्कार, नवी दिल्ली संस्थेकडून जीवनगौरव पुरस्कार, ओबीसी सेवा संघाकडून मंडल आयोग सन्मान पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले ग्लोबल प्राइड समाज अवॉर्ड तसेच प्रतिभा सन्मान गोल्डन पिकअप २०२१, सामाजिक कार्य गौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व संविधान अमृत महोत्सव समिती भंडारा चे अध्यक्ष आहेत. त्यांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी(बँक) च्या भागभांडवल विक्रीची जबाबदारी स्वीकारली आहेत. इंजि. रुपचंद रामटेके यांना शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ मिळाल्या प्रीत्यर्थ त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या