चित्रा न्युज ब्युरो
अकोला : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
योजनेद्वारे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, इतर शैक्षणिक सुविधांसाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते. विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या पोर्टलवर दि. 30 नोव्हेंबरपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा व त्याची प्रत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनातील समाजकल्याण कार्यालयात आणून द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
०००
0 टिप्पण्या